ओडिशात पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा रोडावली; रशिया, मंगोलिया, नैैऋत्य आशियातील पक्षी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:16 PM2018-01-06T23:16:11+5:302018-01-06T23:17:38+5:30

यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले.

The number of birds in Odisha has been hit this year; More from Russia, Mongolia, southwest Asia | ओडिशात पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा रोडावली; रशिया, मंगोलिया, नैैऋत्य आशियातील पक्षी अधिक

ओडिशात पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा रोडावली; रशिया, मंगोलिया, नैैऋत्य आशियातील पक्षी अधिक

googlenewsNext

बे-हामपूर (ओडिशा) : यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले. खा-या पाण्याच्या या सरोवर परिसरात बुधवारी पाहुण्या पक्ष्यांची वार्षिक गणना केली असता १४७ प्रजातींचे ८९३,३९० पक्षी या ठिकाणी मुक्कामी आल्याचे आढळून आले.
मागच्या हिवाळ्यात या ठिकाणी विविध १६७ प्रजातींच्या ९४७,११९ पक्ष्यांच्या आगमनाने या सरोवराच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर पडली होती. ठिकठिकाणी पक्ष्यांचे थवे मनसोक्तपणे कधी बागडत, तर कधी विसावा घेताना आढळले. यापैकी नालबाना पक्षी अभयारण्यात ३४७,७५६ पाहुण्या पक्ष्यांनी डेरा टाकला होता, असे विभागीय वन अधिकारी (चिल्का वन्यजीव विभाग) विकास रंजन दास यांनी सांगितले.
यंदाच्या मौसमात मात्र या ठिकाणी ३२०,८२६ पक्षी आढळून आले. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे यावर्षी भेटीस आलेल्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली असावी, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

आधीच मोजणी
यावेळी नियोजित वेळेआधी दहा दिवस आधीच गणना करण्यात आली. स्थानिक टिटवी हा पक्षी मात्र यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी दिसून आला. रशिया, किर्गिझ, मंगोलिया आणि नैऋत्य आशियातून या ठिकाणी येणाºया पक्ष्यांची नेहमी गर्दी असते. या पाहुण्या पक्ष्यांचा परतीचा प्रवास उन्हाळ्याच्या सुरुवातीस सुरू होतो.

Web Title: The number of birds in Odisha has been hit this year; More from Russia, Mongolia, southwest Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.