पुढील 100 दिवसांत निवडणूक झाल्यास मी राजकारणात प्रवेश करणार - कमल हासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:36 AM2017-09-22T09:36:02+5:302017-09-22T09:42:04+5:30

अभिनेता कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना पहिल्यांदाच आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत.

In the next 100 days, I will enter politics - Kamal Haasan | पुढील 100 दिवसांत निवडणूक झाल्यास मी राजकारणात प्रवेश करणार - कमल हासन

पुढील 100 दिवसांत निवडणूक झाल्यास मी राजकारणात प्रवेश करणार - कमल हासन

Next
ठळक मुद्देजर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत'कोणत्याही राजकीय पक्षाशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण सर्व राजकीय पक्षांना मदत करण्यासाठी तयार असून, कोणासोबतही युती करणार नाही''मी त्यांच्यापैकी कोणासोबतही काम करण्यास जात नाही आहे. मी एकटाच पुढे जात राहीन'

नवी दिल्ली, दि. 22 - अभिनेता कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना पहिल्यांदाच आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले आहेत. टाइम्स नाऊशी बोलताना कमल हासन बोलले आहेत की, कोणत्याही राजकीय पक्षाशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण सर्व राजकीय पक्षांना मदत करण्यासाठी तयार असून, कोणासोबतही युती करणार नाही. 'मी त्यांच्यापैकी कोणासोबतही काम करण्यास जात नाही आहे. मी एकटाच पुढे जात राहीन', असं कमल हासन यांनी सांगितलं. 

अण्णाद्रमूकमधील (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगम) अंतर्गत वादावर बोलताना कमल हासन यांनी सांगितलं की, 'हे जबरदस्तीने लावण्यात आलेलं लग्न आहे. यामधून नवरीमुलीला म्हणजेच तामिळनाडू जनतेला बाहेर पडायचं आहे. जर 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर मी राजकारणात प्रवेश करणार'.

कमल हासन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल सांगताना, आपण राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याच्या निर्णयाचं त्यांनी कौतुक केल्याचं सांगितलं. कमल हासन बोलले आहेत की, 'मी चार ते पाच आठवड्यांपुर्वी रजनीकांत यांची भेट घेतली. आम्ही खूप वेळ चर्चा केली. आमच्या दोघांचंही एकच लक्ष्य आहे. सर्वात आधी भ्रष्टाचाराविरोधात लढाई लढली पाहिजे असं आम्हा दोघांनाही वाटतं. यासाठी त्यांनी एक मार्ग निवडला असून मी दुसरा निवडला आहे. आम्ही यासंबंधी विस्तृत चर्चा केली नाही, त्यामुळे असहमत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी त्यांची गळाभेट घेतली आणि राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं'.

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्यास दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीचे हे दोन्ही सुपरस्टार्स राजकारणात कशाप्रकारे आपल्या भूमिका निभावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कमल हासन यांनी सांगितलं की, आम्ही इतर पक्षांसमोर एक उदाहरण ठेवणार आहोत. 

याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर अभिनेता कमल हासन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं होतं. या भेटीमुळे अभिनेता कमल हासन लवकरच दक्षिण भारतात सक्रीय राजकारणात प्रवेश करतील असा अंदाज लावला जात होता. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची भेट घेतल्यानंतर कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना ही भेट अनुभवपुर्ण असल्याचं सांगितलं. भेटीआधी कमल हासन यांनी आपण केरळच्या मुख्यमंत्र्यांशी सल्ला-मसलत करण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं होतं. भेटीनंतर बोलताना, आपण माझ्या चित्रपटांमध्ये अनेक रंग पाहिले असतील पण भगवा पाहिला नसेल असंही त्यांनी सांगितलं होतं. 
 

Web Title: In the next 100 days, I will enter politics - Kamal Haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.