मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी

By admin | Published: September 8, 2016 12:15 PM2016-09-08T12:15:15+5:302016-09-08T12:24:17+5:30

रिलायन्स जिओच्या जाहीरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन झालेला वाद निरर्थक असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

Modi is your Prime Minister and he is my prime minister - Mukesh Ambani | मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी

मोदी तुमचे पंतप्रधान तसेच ते माझेही पंतप्रधान - मुकेश अंबानी

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ८ - रिलायन्स जिओच्या जाहीरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन झालेला वाद निरर्थक असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. रिलायन्स जिओच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्यात आला होता. त्यावर अनेकांनी टीका केली होती. 
 
मुकेश अंबानी यांना इकोनॉमिक टाइम्स या  इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. मोदींच्या फोटोवरुन झालेला वाद निरर्थक आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते जेवढे तुमचे पंतप्रधान आहेत, तसेच ते माझेही पंतप्रधान आहेत असे मुकेश यांनी सांगितले. 
 
त्यांनी डिजिटल इंडियाचा दृष्टीकोन दिला. ज्यामधून मला स्वत:ला प्रेरणा मिळाली आहे. पंतप्रधानांचे जे डिजिटल इंडियाचे स्वप्न आहे त्याला आम्ही आमच्या सेवा समर्पित करतो. यात काहीही राजकारण नाही असे मुकेश यांनी सांगितले. 
 
रिलायन्स जिओमध्ये केलेल्या गुंतवणूकीचे अजिबात नुकसान होणार नाही. जिओमधून निश्चिम आम्हाला फायदा होईल मला पूर्ण विश्वास आहे असे मुकेश यांनी सांगितले.  
 

Web Title: Modi is your Prime Minister and he is my prime minister - Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.