दहशतवाद्यांची शंभरी भरली! सात महिन्यांत १०२ दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: July 14, 2017 10:08 PM2017-07-14T22:08:51+5:302017-07-14T23:22:22+5:30

गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Militants full of terrorists! End of 102 terrorists in seven months | दहशतवाद्यांची शंभरी भरली! सात महिन्यांत १०२ दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांची शंभरी भरली! सात महिन्यांत १०२ दहशतवाद्यांचा खात्मा

Next
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १४ - जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षात जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती आज पोलिसांनी दिली आहे. 
एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. 
लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. 
अधिक वाचा
(छोट्या युद्धांसाठी केंद्राची तयारी, लष्कराला आर्थिक निर्णय घेण्याचा हक्क )
(पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद )
(जम्मू काश्मीर : AK-47सहीत टेरिटोरियल आर्मीचा जवान बेपत्ता )
लष्कराच्या कारवाईमुळे जानेवारी ते जुलैदरम्यान १०२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. याआधी २०१० साली लष्कराने सुमारे १५६ दहशतवाद्यांना ठार केले होते. तर २०१६ मध्ये याच काळात ७७, २०१५ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी ५१, २०१३ मध्ये ४३, २०१२ मध्ये ३७ आणि २०११ मध्ये ६१ दहशतवाद्यांना चकमकीत कंठस्नान घालण्यात आले होते.  
दहशवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात  आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Militants full of terrorists! End of 102 terrorists in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.