नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 04:38 PM2019-03-05T16:38:55+5:302019-03-05T16:42:01+5:30

लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे.

Kill the Narendra Modi, Congress leader Appeal's | नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

ठळक मुद्देकर्नाटकमधील एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करताना त्यांची हत्या करण्याचे आवाहन उपस्थितांना केलेयासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने कर्नाटकमध्ये खळबळ बेलूर गोपालकृष्णन असे मोदींची हत्या करण्याचे आवाहन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव

बंगळुरू - लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली असून, कर्नाटकमधील एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करताना त्यांची हत्या करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. 

बेलूर गोपालकृष्णन असे मोदींची हत्या करण्याचे आवाहन करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे. त्यांनी एका जाहीर समारंभात उपस्थितांना संबोधित करताना हे आवाहन केले होते. दरम्यान, या प्रकारानंतर कर्नाटक भाजपाने संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरून या संदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच देशाच्या पंतप्रधानांची हत्या करण्यासाठी चिथावणी देणे हा देशासाठी धोका आहे.  या संदर्भात कर्नाटकचे गृहमंत्रालय आणि बंगळुरूचे पोलीस आयुक्त यांनी त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक भाजपाने केली आहे. 





उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बेलूर गोपालकृष्णन हे  भाजपामध्ये होते. मात्र शिमोगा जिल्ह्यातील सागर मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर कर्नाटक विधानसभेची निवडणूक निवडणूक झाल्यानंतर त्यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपा हा खोटारडा पक्ष असून, प्रामाणिक कार्यकर्त्यांची तिथे कदर केली जात नाही, असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.  

Web Title: Kill the Narendra Modi, Congress leader Appeal's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.