जाहिरातीमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या अंगलट; उत्तर प्रदेशात सलूनची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 02:56 PM2017-09-09T14:56:02+5:302017-09-09T16:35:38+5:30

जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

Javed Habib's flutter to cast photographs of Hindu deities in the advertisement; Saloon sabotage in Uttar Pradesh | जाहिरातीमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या अंगलट; उत्तर प्रदेशात सलूनची तोडफोड

जाहिरातीमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या अंगलट; उत्तर प्रदेशात सलूनची तोडफोड

Next
ठळक मुद्देजाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे. री उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या जावेद हबीबच्या सलूनवर संतप्त जमावाने हल्ला केला.जावेद हबीबच्या सलूनवर हल्ला करणारे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लखनऊ, दि. 9- काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबच्या सलून्सच्या देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरण्यात आले होते. जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचे फोटो वापरणं जावेद हबीबच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचं अपमानजनक चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबाद येथील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ अंतर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान शनिवारी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या जावेद हबीबच्या सलूनवर संतप्त जमावाने हल्ला केला. इतकंच नाही, तर सलूनमधील सामानाची तोडफोड केली. 

जावेद हबीबच्या सलूनवर हल्ला करणारे हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यांनी आधी मोतीनगरमधील सलूनवरही हल्ला केला होता, असंही पोलिसांनी सांगितलं. हिंदू जागरण मंचाकडून झालेल्या हल्ल्याच्या वेळी सलूनमध्ये काही ग्राहक अडकले होते. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या सलून मालकाला त्यांचा व्यवसाय बंद करा अन्यथा त्याचे परिणाम भोगण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सलूनमध्ये त्यावेळी असलेल्या काही प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेतली जाते आहे. 

हिंदू देवतांचा अपमान करणारी गोष्ट घडली तर त्याकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष केलं जाणार नाही. आम्ही जावेद हबीबचं हे सलून चालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया हिंदू जागरण मंचाचे प्रादेशिक सचिव विमल द्विवेदी यांनी दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?
सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांने सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रांमध्ये आक्षेपार्ह जाहिराती दिल्या. जाहिरातीमध्ये हिंदू देवी-देवता हबीब यांच्या सलूनमध्ये आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातींवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. यावरून काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जावेद हबीब यांच्या सलूनवर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली होती. भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणा देत जावेद हबीब याचा निषेधही नोंदवला होता. त्यानंतर काही वेळातच हबीब याने ट्विटरवरून माफी मागितली होती.
 
हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 
सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्याविरुद्ध हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. देशभरात जावेद हबीब यांच्या मालकीच्या सलून्सची चेन आहे. त्यांच्या जाहिरातीसाठी काही दिवसांपूर्वी देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. पण, जाहिरातींमध्ये हिंदू देवतांचं अपमानास्पद चित्रीकरण होत असल्याचा आरोप करत हैदराबादमधील वकील करूण सागर यांनी सईदाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याच्या २९५ अ या कलमातंर्गत जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच जावेद हबीब यांना नोटीस पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी हबीबकडून अगोदरच लेखी माफीपत्र सादर करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेतला जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितले.
 

Web Title: Javed Habib's flutter to cast photographs of Hindu deities in the advertisement; Saloon sabotage in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.