"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 05:11 PM2024-06-11T17:11:22+5:302024-06-11T17:13:13+5:30

Ssmilly Suri : अभिनेत्रीने आर्थिक संकटातून जात असलेल्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

Ssmilly Suri faced financial crisis lived with rs 2 in bank savings exhausted starved few days | "बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"

'हाउस ऑफ लाईज'मधून स्मायली सूरीने अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. ती आलिया भट आणि पूजा भटची चुलत बहीण आहे. सिद्धार्थ काननसोबत संवाद साधताना, अभिनेत्रीने ती आर्थिक संकटातून जात असलेल्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. "माझ्या बँकेत फक्त २ रुपये होते, फक्त यावरच मी जगले. अनेक वेळा माझ्याकडे पैसेच नसायचे."

"मी सिंगापूरला पोल डान्सच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. मला तो पोल विकत घ्यायचा होता ज्याची किंमत १०० डॉलर्स (८३,४९८ रुपये) होती. मी हिशोब केला होता की जर मी चार दिवस जेवली नाही तर मी कदाचित पोल विकत घेऊ शकेन आणि म्हणून मी तेच केलं."

"मुंबईत कोरोनाच्या काळात माझी सर्व सेविंग संपली. माझ्याकडे कुत्र्यांसाठी अन्न होतं पण माझ्यासाठी काहीही नव्हतं. अशा परिस्थितीत मी कॉफी आणि १ केळं खाऊन जगले. हे खाऊन मी रात्री झोपायचे. तेव्हा माझं वजनही कमी झालं होतं."

"माझा भाऊ मोहित खूप अस्वस्थ होता. त्याने मला पैसे पाठवले. मी बरेच दिवस उपाशी राहिले. माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते" असं स्मायलीने म्हटलं आहे. तिने महेश आणि मुकेश भट्ट यांच्यातील भांडणाबद्दल सांगितलं. तिच्या मते, या भांडणाचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही, ते कधीही एकत्र नव्हते.

"हे दु:खद आहे पण आम्ही कुटुंब आहोत असं कधीच वाटत नाही. असं अनेक कुटुंबात घडतं. भावा-बहिणीत भांडण होतं, मात्र सर्व काही सीक्रेट ठेवलं जातं" असंही स्मायलीने म्हटलं आहे. तिने कलयुग चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. यानंतर आलेले तिचे चित्रपट फ्लॉप झाले. त्यानंतर ती अभिनय सोडून प्रोफेशनल पोल डान्सर बनली.
 

Web Title: Ssmilly Suri faced financial crisis lived with rs 2 in bank savings exhausted starved few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.