Jammu Kashmir : पूंछमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 11:10 AM2018-12-08T11:10:52+5:302018-12-08T11:26:18+5:30

जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी (8 नोव्हेंबर) बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

JammuAndKashmir: At least 11 dead after a bus skidded off the road and fell into a deep gorge in Plera in Mandi | Jammu Kashmir : पूंछमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

Jammu Kashmir : पूंछमध्ये बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी (8 नोव्हेंबर) बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लूरन येथून शनिवारी बस पूंछ येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 



 



 

Web Title: JammuAndKashmir: At least 11 dead after a bus skidded off the road and fell into a deep gorge in Plera in Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.