पाकला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ - बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 09:40 PM2018-09-22T21:40:12+5:302018-09-22T21:44:36+5:30

पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी यांच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमानुष कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे सांगितले.

It is time to give a befitting reply to Pakistan, terrorists - Bipin Rawat | पाकला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ - बिपिन रावत

पाकला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ - बिपिन रावत

Next

नवी दिल्ली: पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी यांच्याकडून जम्मू- काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमानुष कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या घटनांचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलताना जनरल बिपिन रावत म्हणाले की, दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासारखा अमानुषपणा न करताही त्यांनाही आपल्यासारखे क्लेष जाणवायला हवेत.


तसेच, पाकिस्तानकडून दहशतवादास खतपाणी घालणे सुरु असेपर्यंत त्या देशाशी बोलणी केली जाऊ शकत नाहीत, या सरकारी भूमिकेचा लष्करप्रमुखांनी पुनरुच्चार केला.



 



 

Web Title: It is time to give a befitting reply to Pakistan, terrorists - Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.