रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता AC क्लासमध्ये RAC कन्फर्म तिकीट असलेल्यांनाही मिळेल बेडरोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:24 PM2023-12-21T15:24:30+5:302023-12-21T15:30:03+5:30

भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट धारकांना बेडरोल किट (लिनेन आणि ब्लँकेट) देण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

indian railways rac confirmed ticket holders will also get bedroll in ac class irctc update | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता AC क्लासमध्ये RAC कन्फर्म तिकीट असलेल्यांनाही मिळेल बेडरोल!

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता AC क्लासमध्ये RAC कन्फर्म तिकीट असलेल्यांनाही मिळेल बेडरोल!

Indian Railways   ( Marathi News ) : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटले जाते, कारण देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. एकीकडे, रेल्वे वेळेवर धावण्यासाठी भारतीय रेल्वे विविध तांत्रिक बदल करत असते. दुसरीकडे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन प्रवासादरम्यान प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वेळोवेळी वाढ करत असते. 

याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट धारकांना बेडरोल किट (लिनेन आणि ब्लँकेट) देण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, असे अनेक रेल्वे प्रवासी आहेत, ज्यांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही आणि त्यांची तिकिटे आरएसी कॅटगरीत कन्फर्म होतात. 

अशा परिस्थितीत, प्रवाशाला बाजूला लोअर बर्थ दिला जातो. ज्यावर एकाच वेळी दोन प्रवाशांची तिकिटे कन्फर्म होतात. जेणेकरून बाजूच्या लोअर बर्थचे खुर्चीत रूपांतर करून त्यावर बसून प्रवास पूर्ण करता येतो. अशा प्रवाशांना एसी कोचमध्ये बेडरोलची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता आरएसी प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, रेल्वेने १८ डिसेंबरला आपल्या सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र जारी केले आहे. यामध्ये आरएसी तिकीट धारकांना प्रवासादरम्यान संपूर्ण बेडरोल किटची सुविधा देखील प्रदान करण्यास सांगितले आहे. 

या पत्रात स्पष्टपणे लिहिले आहे की, बेडरोल किटचे भाडेही तिकीटासोबत आरएसी तिकीटधारकांकडून वसूल केले जाते. त्यामुळे त्याच कॅटगरीत प्रवास करणाऱ्या आरएसी तिकीट धारकांना बेडरोल किटही पुरवल्या जाव्यात. ही सुविधा एसी चेअर कारच्या प्रवाशांसाठी नाही, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात माहिती देताना ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह म्हणाले की, सिंगल क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी तिकीटधारकांना संपूर्ण बेडरोल किट देण्याबाबत मंत्रालयाकडून पत्र प्राप्त झाले आहे. यावर कारवाई सुरू आहे.

Indian Railways

Web Title: indian railways rac confirmed ticket holders will also get bedroll in ac class irctc update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.