भारत अमेरिकेकडून घेणार रासायनिक हल्लेविरोधी सुट्स, संभाव्य हल्ल्यांसाठी भारताची तयारी

By Admin | Published: May 13, 2017 02:39 AM2017-05-13T02:39:05+5:302017-05-13T02:39:05+5:30

रासायनिक, जैविक, किरणोत्सारी किंवा अण्वस्त्रांच्या (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर-सीबीआरएन) संभाव्य हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी भारत

India will take chemical attack suits from India, preparations for possible attacks | भारत अमेरिकेकडून घेणार रासायनिक हल्लेविरोधी सुट्स, संभाव्य हल्ल्यांसाठी भारताची तयारी

भारत अमेरिकेकडून घेणार रासायनिक हल्लेविरोधी सुट्स, संभाव्य हल्ल्यांसाठी भारताची तयारी

googlenewsNext

वॉशिंग्टन : रासायनिक, जैविक, किरणोत्सारी किंवा अण्वस्त्रांच्या (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर-सीबीआरएन) संभाव्य हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी भारत अमेरिकेकडून अण्वस्त्रविरोधी आणि रसायनविरोधी सुट्स (ड्रेस किंवा कपडे) विकत घेणार आहे. ७५ दशलक्ष डॉलर्सचा (४८० कोटी रुपये) हा व्यवहार आहे.
भारताने साधारण उद्देशाचे ३८ हजार ३४ एम ५० मुखवटे (मास्कस) मागितले आहेत. जॉइंट सर्व्हिस लाइटवेट इंटिग्रेटेड सूट टेक्नॉलॉजीत ३८ हजार ३४ सुट्समध्ये ग्लोव्हज्, ट्राऊझर्स आणि बूट, एनबीसी बॅग्ज, ८५४ अ‍ॅप्रन्स, ८५४ पर्यायी अ‍ॅप्रन्स, ९,५०९ क्विक डॉफ हूडस् आणि ११४,१०२ एम ६१ फिल्टर्सचा समावेश आहे, असे अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-आॅपरेशन एजन्सीने म्हटले. (वृत्तसंस्था)
अमेरिकेने या सुट्स विक्रीला ११ मे रोजी मान्यता दिली. या खरेदीमुळे भारताची रासायनिक, जैविक
किंवा अण्वस्त्रांवर आधारित संभाव्य
हल्ले झाल्यास ते हाताळण्याची, त्यांना रोखण्याची आणि एवढेच काय त्यांना हाणून पाडण्याची क्षमता निश्चितपणे वाढणार आहे, असे डीएससीएने अमेरिकेच्या काँग्रेसकडे केलेल्या निवेदनात म्हटले.
भारत सरकारला सीबीआरएन हल्ल्यांत सुरक्षा देणारी उपकरणे विकण्यास मान्यता देऊन अमेरिकेने ठाम भूमिका घेतली आहे, असे एजन्सीने म्हटले.

Web Title: India will take chemical attack suits from India, preparations for possible attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.