भारत मागे राहू शकत नाही! - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:17 AM2017-10-30T03:17:17+5:302017-10-30T03:17:37+5:30

डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.

India can not stay behind! - Prime Minister Modi | भारत मागे राहू शकत नाही! - पंतप्रधान मोदी

भारत मागे राहू शकत नाही! - पंतप्रधान मोदी

Next

उजिरे (कर्नाटक) : डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.
मंगळुरुजवळ ५० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात येथे रॅलीत बोलताना मोदी म्हणाले की, डिजिटल चलनाचे युग आता सुरु झाले आहे. यात भारत मागे राहू शकत नाही. नगदीच्या वापरामुळे सामाजिक दोष वाढत जातील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत काही दिग्गजांनी संसदेत भाषण केले. हे दिग्गज स्वत:ला तीस मार खा समजतात. जे स्वत:ला ज्ञानाचे केंद्र मानतात. ते म्हणत होते की, भारतात गरीबी आहे. शिक्षणाचा अभाव आहे. अशात डिजिटल व्यवहार काम करु शकत नाहीत. या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले की, लोक कसे काय नगदीशिवाय व्यवहार करु शकतात.
यावेळी मोदी यांनी रॅलीत प्रतिकात्मक स्वरुपात एका लाभार्थ्याला रुपे कार्ड भेट दिले. जनधन योजनेंतर्गत १२ लाख खातेधारक रुपे कार्डधारक होतील. मोदी म्हणाले की, काळ बदलत आहे आणि त्यासोबत चलनही बदलत आहे. एकेकाळी दगड असलेले व नंतर लेदर, सोने, चांदी, कागद आणि प्लास्टिक असे हे स्थित्यंतर आहे. आता डिजिटल चलनाचे युग सुरु झाले आहे. यात भारताने मागे राहू नये. जगातील विकसित देश कौशल्य विकासावर चर्चा करत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, भारतात ३५ वर्षांच्या आतील ८० कोटी म्हणजेच लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक आहेत. या लोकांवर आपल्याला गर्व आहे.

दिल्लीहून १ रुपया, गावात पोहोचतात १५ पैसे
मोदी म्हणाले की, आमच्या एका माजी पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, जर १ रुपया दिल्लीतून जात असेल तर, गावात पोहचेपर्यंत १५ पैसे राहतात. थेट हस्तांतरण योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५७,००० कोटी रुपये अवैध स्वरुपात कुणाच्या हातात जात होते. सरकारच्या प्रयत्नांनी हे प्रकार थांबले.

Web Title: India can not stay behind! - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.