होळीमध्ये आपला फोन कसा वाचवाल? या आहेत 10 टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:18 PM2018-02-27T16:18:35+5:302018-02-27T16:20:55+5:30

होळीमध्ये रंगांची उधळण करताना फोन खराब होण्याची शक्यता असते.

How to save your phone in Holi? These are 10 tips | होळीमध्ये आपला फोन कसा वाचवाल? या आहेत 10 टिप्स

होळीमध्ये आपला फोन कसा वाचवाल? या आहेत 10 टिप्स

googlenewsNext

नवी दिल्ली : बंधूप्रेमाचा आणि रंगाचा उत्सव असलेले होळीपर्व देशभरात हर्षोल्हासात साजरा करण्यात येईल. एक मार्च रोजी  देशाच्या विविध प्रांतात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाईल. या दिवशी रंगांची उधळण करुन होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरी करतात. होळी खेळत असताना आपण कधीकधी विसरतो की आपल्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे. होळीमध्ये रंगांची उधळण करताना फोन खराब होण्याची शक्यता असते. याआधी आपला होळीमध्ये आपला फोन खराब झाला असेल? तर तीच चूक पुन्हा होऊ नये असं आपल्याला नक्कीच वाटत असणार. त्यासाठी आम्ही काही महत्वाच्या टिप्स देत आहोत. या रंगोउत्सवात तुम्हाला नक्कीच याची मदत होईल. 

  • होळीच्या दिवशी हात ओले असताना फोनचा वापर करु नका. हात कोरडा करुन फोनचा वापर करा. 
  • या दिवशी जागोजागी लहान मुलं रंग-पाण्याचे फुगे किंवा पिचकारी घेऊन असतात. अशावेळी आपल्या फोनला वाटरप्रूफ कवर टाकलेलं असावं. 
  • होळी खेळायला सुरुवात करण्यापूर्वी आपला फोन सुरक्षित ठिकाणी ठेवावा. किंवा वाटरप्रूफ बॅगमध्येही ठेवू शकता. आजकाल बाजारामध्ये पाउच मिळतात त्याचा वापर जरी केला तरी चालेल. 
  • डोकं ओलं असेल तर मोबाईलचा वापर टाळा. कारण कान किंवा केसापासून पाणी तुमच्या मोबाईलवर पडू शकते. 
  • होळीच्या दिवशी फोन घेऊन जात असाल तर  इयरफोन अथवा ब्लूटूथ घेऊन चला. यामुळं फोन खिशातून किंवा पाऊचमधून न काढता बोलता येईल.  
  • प्रोटेक्ट करुनही तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास आलेले फोन उचलू नका किंवा कोणाला फोनही करु नका. कारण स्पार्किंग होऊ शकते आणि तुमचा फोन खराब होण्याची शक्याता जास्त आहे. 
  • फोनमध्ये पाणी गेल्यास तो तात्काळ स्विच ऑफ करा. फोनची बॅटरी काढून कॉटनच्या कपड्यानं कोरडा करा. जोपर्यंत मोबईल पूर्णपणे कोरडा होत नाही. तोपर्यंत ऑन करु नका. 
  • भिजलेला फोन कोरडा केल्यानंतर त्यामध्ये काही अंशी ओलसरपणा राहण्याची शक्याता आहे. अशावेळी तांदळाच्या डब्यात 12 तास ठेवा. 
  • फोन कोरडा करण्यासाठी हेअर ड्राएरचा वापर करु नका. हेअर ड्राएरचा वापर केल्यास मदरबोर्ड खराब होऊ शकतो. 
  • वॅक्यूम क्लीनरनेही तुम्ही मोबईल कोरडा करु शकता. 

Web Title: How to save your phone in Holi? These are 10 tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.