ओडिशामध्ये भीषण अपघात! व्हॅनची ट्रकला जोरदार धडक, ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:26 AM2023-12-01T10:26:56+5:302023-12-01T10:27:23+5:30

ओडिशा येथील केओन्झारमध्ये भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.

Horrible accident in Odisha Van collides with truck, 7 killed | ओडिशामध्ये भीषण अपघात! व्हॅनची ट्रकला जोरदार धडक, ७ जणांचा मृत्यू

ओडिशामध्ये भीषण अपघात! व्हॅनची ट्रकला जोरदार धडक, ७ जणांचा मृत्यू

ओडिशामध्ये आज सकाळी व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. हा अपघात केओन्झारमध्ये झाला. २० लोकांना घेऊन जाणारी व्हॅन समोर असलेल्या ट्रकवर आदळली. या घटनेत काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

बंदुकीच्या धाक दाखवून शिक्षकाला पळवले, मुलीसोबत लग्न लावले, पकडौआ विवाहाच्या धक्कदायक घटनेने खळबळ

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा व्हॅनचा वेग खूपच जास्त होता, असे पोलिसांनी सांगितले. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नाही आणि अपघात झाला.

पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण सांगितलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, नुकसान झालेल्या व्हॅनचे तुकडे कित्येक मीटर अंतरावर पडले.

मृतांमध्ये बीजेडीच्या माजी राज्यसभा खासदार रेणुबाला प्रधान यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना घाटगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

Web Title: Horrible accident in Odisha Van collides with truck, 7 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात