स्वयंपाकपाण्याचे धडे देणारं होम सायन्स आता मुलांसाठी होणार सक्तीचं! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:00 PM2017-07-27T15:00:26+5:302017-07-27T15:07:03+5:30

भारतात गृहविज्ञान (होम सायन्स) हा विषय म्हणजे सामान्यतः मुलींचं क्षेत्र मानलं जातं. मात्र, आता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता आहे.

Home Science compulsory for boys proposal | स्वयंपाकपाण्याचे धडे देणारं होम सायन्स आता मुलांसाठी होणार सक्तीचं! 

स्वयंपाकपाण्याचे धडे देणारं होम सायन्स आता मुलांसाठी होणार सक्तीचं! 

Next
ठळक मुद्देआता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता महिला व बालकल्याण मंत्रालयाने याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास शाळेमध्ये होम सायन्सचं शिक्षण मुलांसाठी बंधनकारक

मुंबई, दि. 27 - भारतात गृहविज्ञान (होम सायन्स) हा विषय म्हणजे सामान्यतः मुलींचं क्षेत्र मानलं जातं. मात्र, आता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता आहे. मुलांसाठी गृहविज्ञान या विषयाचं शिक्षण घेणं लवकरच अनिवार्य होण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण मंत्रालयाने याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवला आहे. 

महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला धोरण 2017 चा मसुदा मंत्रिगटाने मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास शाळेमध्ये होम सायन्सचं शिक्षण मुलांसाठी बंधनकारक होईल. बालपणापासूनच स्त्री-पुरूषांच्या कामात भेदभाव व्हायला नको, महिलांना करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्याव्या यासारख्या अनेक सूचनांचा समावेश या प्रस्तावाच्या मसुद्यात आहे. 

काय आहेत यामध्ये सूचना- 
-गृहविज्ञान व शारीरिक शिक्षण हे विषय मुलगे व मुली यांना सक्तीचे करावेत
-बालपणापासूनच स्त्री-पुरूषांच्या कामात भेदभाव व्हायला नको
-महिलांना करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात 
-मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रमात लिंगभाव संवेदनशीलता दाखवणे गरजेचे 
-महिला व पुरुषांना समानपदासाठी समान वेतन
-व्यावसायिक संकुलात लहान मुलांना ठेवण्यासाठी खास सुविधा, विधवा व घटस्फोटित महिलांना कर सवलती
-शाळांच्या बस महिला चालकांना चालवण्यास देणे 
 


 

Web Title: Home Science compulsory for boys proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.