गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केली देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी, हे ठाणे ठरले अव्वल

By बाळकृष्ण परब | Published: December 3, 2020 07:38 PM2020-12-03T19:38:06+5:302020-12-03T19:38:06+5:30

Police Station News : देशातील टॉप-१० पोलीस ठाण्यांच्या यादीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील पोलीस ठाण्यांना स्थान मिळाले आहे.

Home Ministry has released a list of top 10 police stations in the country | गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केली देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी, हे ठाणे ठरले अव्वल

गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केली देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी, हे ठाणे ठरले अव्वल

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टॉप-१० पोलिस ठाण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही. गृहमंत्रालयाने आव्हानात्मक परिस्थितीत यावर्षीही सर्वश्रेष्ठ पोलिस ठाण्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये यावेळी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यालासुद्धा एका श्रेणीत ठेवण्यात आले होते. हे सर्वेक्षण सरकारच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले होते.

देशातील टॉप-१० पोलीस ठाण्यांच्या यादीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील पोलीस ठाण्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये मणिपूरमधील थौबल येथील नोंगपोक सेमकई पोलिस ठाण्याने अव्वल क्रमांक पटकावला. तामिळनाडूमधील एडब्ल्यूपीएस सुरमंगलम पोलिस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर अरुणाचल प्रदेशमधील खरसांग पोलिस ठाण्याला तिसरा क्रमांक मिळाला. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस ठाण्याला स्थान देण्यात आलेले नाही.

देशातील दहा पोलिस ठाणी
नोंगपोक सेमकई (थौबल, मणिपूर)
एडब्ल्यूपीएस सुरमंगलम (सालेम, तामिळनाडू)
खरसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश)
झिलमिल (सुरजापूर, छत्तीसगड)
संगुएम (दक्षिण गोवा, गोवा)
कालीघाट (उत्तर आणि मध्य अंदमान, अंदमान आणि निकोबार)
पॉकयाँग (पूर्व जिल्हा, सिक्किम)
कांठ (मुरादाबाद, उत्तर प्रदेश)
खानवेल (दादरा आणि नगर हवेली)
जम्मीकुंटा टाऊन (करीमनगर, तेलंगाणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये ठाण्यांची यादी काढण्यास सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आर्थिक गुन्हे, महिलांसंबंधींचे गुन्हे, दुर्बल घटकांबाबतचे गुन्हे याबाबतचे निराकरण करण्याच्या आधारावर ही यादी तयार केली जाते.

Web Title: Home Ministry has released a list of top 10 police stations in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.