हिज्बुलचा कमांडर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:02 AM2017-08-14T05:02:20+5:302017-08-14T05:02:25+5:30

Hizbul commander killed | हिज्बुलचा कमांडर ठार

हिज्बुलचा कमांडर ठार

Next

जम्मू : दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश आहे.
शोपिया जिल्ह्यात अवनीरा गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू - काश्मीर पोलीस, सैन्यदल आणि सीआपीएफने विशेष मोहीम हाती घेऊन तपास सुरू केला. याच वेळी चकमक उडाली. यात सैैन्याचे पाच जवान जखमी झाले. जखमी झालेल्या पाच जवानांना सैन्याच्या ९२ बेस येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा नंतर मृत्यू झाला.
रात्रभर चकमक सुरू होती. सकाळी तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात तांत्रिक आणि आॅनलाइन काम पाहणारा इरफान आणि गजनवी याचा खासगी सुरक्षा रक्षक उमर यांचा समावेश आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर एक केके सीरिजची रायफल आणि दोन एके सीरिजच्या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
।कोण होता यासिन इटू
हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर अशी त्याची ओळख होती. गतवर्षी बुºहान वानीला मारल्यानंतर, काश्मिरातील कारवायांत तो सहभागी होता. त्याने संघटनेत अनेकांची भर्तीही केली आहे.
१९९६ मध्ये हिज्बुलशी जोडला गेला होता. २००७ मध्ये त्याने आत्मसमर्पण केले होते. २०१४ मध्ये पॅरोलवर सोडल्यानंतर, तो पुन्हा अतिरेकी संघटनेत सहभागी झाला.
अतिरेकी पळ काढत आहेत
काश्मिरातून आता अतिरेकी पळ काढत आहेत. घुसखोरी करणाºया अतिरेक्यांची संख्याही घटली आहे. चकमकीच्या वेळी यापूर्वी शेकडो लोक दगडफेक करत, अतिरेक्यांना पळून जाण्यात मदत करत होते, पण आता या दगडफेक करणारांची संख्या २०, ३० अशी झाली आहे.
- अरुण जेटली, संरक्षणमंत्री
वर्षभरात १३२ अतिरेकी मारले
जम्मू -काश्मिरात या वर्षी १३२ अतिरेक्यांना ठार मारले आहे. यात सहा मोठे अतिरेकी होते. त्यात लष्कर-ए- तोयबाचा अबू दुजाना, बुºहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमद भट आदींचा समावेश आहे. गत सात वर्षांच्या तुलनेत या सात महिन्यांत काश्मिरात सर्वाधिक अतिरेक्यांना मारण्यात आले.
आज अंत्यसंस्कार
शहीद सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Hizbul commander killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.