BAGHPAT: टी-20 आजची नाही, मी 24 वर्षांपूर्वी सुरु केलेले सामने; एका कुप्रसिद्ध बाबाचा दावा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:11 PM2022-11-21T20:11:22+5:302022-11-21T20:11:55+5:30

उत्तर प्रदेशातील बिनौली बागपत येथील डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Gurmeet Ram Rahim has claimed that T20 is not for today, it was started 24 years ago  | BAGHPAT: टी-20 आजची नाही, मी 24 वर्षांपूर्वी सुरु केलेले सामने; एका कुप्रसिद्ध बाबाचा दावा! 

BAGHPAT: टी-20 आजची नाही, मी 24 वर्षांपूर्वी सुरु केलेले सामने; एका कुप्रसिद्ध बाबाचा दावा! 

googlenewsNext

बागपत : उत्तर प्रदेशातील बिनौली बागपत येथील डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याने पहिल्यांदा टी-10 आणि टी-20 चे क्रिकेट सामने सुरू केले होते. खरं तर यावेळी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम बर्नावा येथील 'डेरा सच्चा सौदा आश्रमात' 40 दिवसांच्या पॅरोलवर आहे. रामरहीम आश्रमातून ऑनलाइन प्रवचन देत आहे. ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याने टी-10 आणि टी-20 क्रिकेट सुरु केले होते. 

ऑनलाइन सत्संगात राम रहीमने सांगितले की, 24 वर्षांपूर्वी त्याने सिरसाच्या जलालना गावात टी-10 क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट सुरू केले होते. तेव्हा मोठे खेळाडू म्हणायचे की हे कोणते क्रिकेट आहे? पूर्वी कोणीही खेळायला येत नव्हते आणि आज संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे. राम रहीम असेही म्हणतो की, पूर्वी एक अठ्ठा (8 धावा) देखील असायच्या. चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्यावर 8 धावा मिळत होत्या आणि आगामी काळात अठ्ठा देखील आताच्या षटकारावर भारी पडणार आहे. 

राजेशाही शैलीत केले ऑनलाइन सत्संग 
रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून 40 दिवसांचा पॅरोल घेऊन बर्नावा आश्रमात आलेला डेरा प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम येथे राजेशाही थाटात वेळ घालवत आहे. राम रहीम हातात मोरपंख घेऊन राजेशाही शैलीत रोज इथे येतो आणि सोशल मीडियाद्वारे ऑनलाइन सत्संग करतो. याशिवाय तो भजनही गातो आणि अनुयायांना गुरुमंत्र देतो.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Gurmeet Ram Rahim has claimed that T20 is not for today, it was started 24 years ago 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.