भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 08:02 AM2024-04-14T08:02:09+5:302024-04-14T08:02:56+5:30

भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणून दिलीप तिर्की, प्रबोध तिर्की यांनी मैदान गाजविले होते.

Former Indian hockey team captain in the election battleground | भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात 

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात 

भुवनेश्वर: भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणून दिलीप तिर्की, प्रबोध तिर्की यांनी मैदान गाजविले होते. आता ते ओडिशातून निवडणुकीचे रणांगण गाजविण्यास सज्ज झाले आहेत. दिलीप तिर्की बिजू जनता दलाच्या तिकिटावर सुंदरगढ लोकसभा मतदारसंघातून, तर काँग्रेसचे उमेदवार प्रबोध तिर्की सुंदरगढ जिल्ह्यातील तलसारा विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत. 

दिलीप तिर्की माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते विद्यमान भाजप खासदार जुआल ओराम यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.   बिजदला आजवर  सुंदरगढमध्ये कधीही विजय मिळालेला नाही. ओराम यांनी सांगितले की, दिलीप तिर्की हे हॉकीतील नामवंत खेळाडू आहेत; पण मीही कसलेला राजकारणी आहे. प्रबोध तिर्की हे भाजपचे विद्यमान आमदार भवानीशंकर भोई व बिजदच्या विनय टोप्पो यांच्या विरोधात लढत आहेेेत.

Web Title: Former Indian hockey team captain in the election battleground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.