कर्नाटकात मोठी घडामोड! काँग्रेसला क्रॉस-व्होटिंगची भीती, भाजप-जेडीएसने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 06:58 PM2024-02-26T18:58:31+5:302024-02-26T19:05:09+5:30

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. उद्या कर्नाटकात राज्यसभा निवडणुका होणार आहेत.

Fear of cross voting in Rajya Sabha elections in Karnataka congress bjp jds | कर्नाटकात मोठी घडामोड! काँग्रेसला क्रॉस-व्होटिंगची भीती, भाजप-जेडीएसने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार दिला

कर्नाटकात मोठी घडामोड! काँग्रेसला क्रॉस-व्होटिंगची भीती, भाजप-जेडीएसने राज्यसभेसाठी पाचवा उमेदवार दिला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. उद्या कर्नाटकात राज्यसभा निवडणुका होणार आहेत. उद्या २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या राजकारणात आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. काँग्रेसकडे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ असताना, भारतीय जनता पक्ष सध्याच्या संख्येच्या आधारे त्यांच्यापैकी एका उमेदवाराला राज्यसभेवर पाठवू शकतो. जनता दलसाठी संशयाची स्थिती आहे, कारण त्यांना राज्यसभेवर उमेदवार पाठवण्यासाठी काँग्रेस आणि इतर अपक्ष उमेदवारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

पंतप्रधान मोदींना लोकसभेपूर्वी मिळाली नव्या पक्षाची साथ, 'टीएमसी' NDA मध्ये सामील...

दरम्यान, कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत नाट्यमय वळण आले आहे. कर्नाटकमधील भाजप-जेडीएस युतीने २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पाचवा उमेदवार उभा केला आहे, हे आता काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. जेडीएसचे माजी राज्यसभा खासदार डॉ. कुपेंद्र रेड्डी हे आगामी निवडणुकीत उमेदवार असतील. काँग्रेसने ३, तर भाजपने १ उमेदवार उभा केला आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी, अजय माकन यांना कर्नाटकमधून उमेदवारी दिल्यानंतर, त्यांच्या आमदारांकडून संभाव्य क्रॉस व्होटिंगबद्दल काँग्रेसला भीती वाटत आहे.

काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार

कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ सदस्य आहेत. राज्यसभेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी ४६ मतांची आवश्यकता असते. ६६ आमदार असलेल्या भाजपकडे ४६ मतांनंतर २० मते शिल्लक आहेत. जेडीएसचे १९ आमदार असून भाजपच्या पाठिंब्यानंतर ही संख्या ३९ वर पोहोचेल. त्यामुळे जेडीएसचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना विजयासाठी आणखी ७ मतांची गरज आहे. तर, भाजप आणि जेडीएसलाही त्यांच्या एका आमदाराच्या क्रॉस व्होटिंगची भीती आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. काँग्रेस आपल्या आमदारांना बेंगळुरूमधील हॉटेलमध्ये ठेवणार आहे.

कर्नाटक राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने नारायण बांडे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने AICC कोषाध्यक्ष अजय माकन, सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात निवडणुकीच्या हालचाली वाढत असताना, काँग्रेसने सोमवारच्या विधानसभा अधिवेशनानंतर राज्यसभेच्या मतदानापर्यंत आपल्या सर्व आमदारांना बेंगळुरूमधील हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, पक्ष त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करण्यासाठी आमदारांची यादी तयार करेल.

Web Title: Fear of cross voting in Rajya Sabha elections in Karnataka congress bjp jds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.