वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:33 AM2023-02-28T05:33:54+5:302023-02-28T05:34:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली ...

Extension of time to apply for increse pension; EPFO decision, apply by May 3 | वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज

वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ३ मार्च २०२३ पर्यंत होती, आता ती वाढवून ३ मे २०२३ करण्यात आली आहे. 

वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्यास कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) या निर्णयाची घोषणा केली आहे. ईपीएफओच्या एकीकृत सदस्य पोर्टलवर अलीकडेच सक्रिय करण्यात आलेल्या यूआरएलमध्ये वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ मे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. वाढीव निवृत्ती वेतनासाठी कर्मचारी आणि त्याची कंपनी अशा दोघांना संयुक्तरीत्या अर्ज करावा लागणार आहे. 

सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे. पेन्शन याेजनेसाठी १५ हजार रुपये मूळ वेतन गृहित धरूनच याेगदान निश्चित हाेत हाेते. मूळ वेतन ५० हजार झाले तरीही याेगदान १५ हजार रुपयांवरच जमा केले जाते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश 
४ नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांची मुदत देण्याचे आदेश दिले होते. 
ही मुदत ३ मार्च २०२३ ला संपणार होती. गेल्या आठवड्यात ईपीएफओने वाढीव पेन्शनसंबंधीचा तपशील जारी केला होता. 
काय आहे योजना?
n नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेंशन (संशोधन) योजना,  २०१४ कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. 
n त्याआधी २२ ऑगस्ट २
०१४ मध्ये ईपीएसमध्ये सुधारणा करून त्यासाठीची वेतन मर्यादा ६,५०० रुपयांवरून वाढवून १५ हजार रुपये केली होती. ईपीएससाठी वेतनातील कंपनीची कपात ८.३३ टक्के करण्यासही मान्यता देण्यात आली होती.

Web Title: Extension of time to apply for increse pension; EPFO decision, apply by May 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.