Jammu Kashmir : शोपियान चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 10:11 AM2018-11-25T10:11:59+5:302018-11-25T11:16:25+5:30

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

An encounter is underway between security forces & terrorists in Kapran Batagund area of Shopian district. 4 terrorists have been neutralised | Jammu Kashmir : शोपियान चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी सकाळी चकमक सुरू झाली आहे. चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे.

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे.  शोपियानमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



 



 

Web Title: An encounter is underway between security forces & terrorists in Kapran Batagund area of Shopian district. 4 terrorists have been neutralised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.