हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:38 AM2017-10-13T04:38:49+5:302017-10-13T04:39:05+5:30

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सर्व ६९ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या नाहीत.

 Election in Himachal Pradesh; Polling on November 9, Gujarat dates are not declared | हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही

हिमाचलमध्ये निवडणूक; ९ नोव्हेंबर रोजी मतदान , गुजरातच्या तारखा जाहीर नाही

Next

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सर्व ६९ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या नाहीत. मात्र गुजरातमध्ये १८ डिसेंबरपूर्वी निवडणुका होतील, असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात ९ नोव्हेंबर रोजी ७,४७९ मतदान केंद्रांवर एकाच टप्प्यात मतदान होईल.
सर्व केंद्रांवर मतदारांनी केलेल्या मतदानाची लेखी पावती देण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राची सोय असेल. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.
विधानसभेची मुदत
७ जानेवारी रोजी संपत आहे. गुजरातच्या निवडणुका जाहीर न केल्याबद्दल काँग्रेसने आयोगावर टीका केली आहे.

Web Title:  Election in Himachal Pradesh; Polling on November 9, Gujarat dates are not declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.