पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक लाख घरांचा ई-गृहप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:25 AM2018-08-23T05:25:54+5:302018-08-23T05:26:15+5:30

‘हाउसिंग फॉर आॅल’; गुजरातच्या वलसाडमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

E-Home entrance of one lakh houses by Prime Minister Modi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक लाख घरांचा ई-गृहप्रवेश

पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक लाख घरांचा ई-गृहप्रवेश

Next

- संतोष ठाकूर 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरातमधील वलसाडमध्ये आपल्या महत्त्वाकांक्षी ‘सर्वांसाठी घर’(हाऊसिंग फॉर आॅल) च्या जवळपास एक लाख लाभार्थ्यांना ई-गृहप्रवेश करून देणार आहेत. एवढेच काय पण, रोजगारातील अयशस्वीतेबाबत विरोधकांकडून आरोप होत असताना ते याला प्रत्युत्तर देणार आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांत स्वयंरोजगार आणि रोजगार मिळविणाऱ्यांना नियुक्तीपत्रही सोपविणार आहेत. असे सांगितले जात आहे की, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी ते वातावरण निर्मिती करतील.
भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाºयांनुसार वलसाड जिल्ह्यात होणाºया या कार्यक्रमासाठी वलसाड, नवसारी, तापी, सुरत, डांग येथील लाभार्थी एकत्र येणार आहेत. तर, अन्य २१ जिल्ह्यांतील लाभार्थी आपल्या जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. वलसाडमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या घरांची किल्ली स्वत: मोदी लाभार्थ्यांना सोपविणार आहेत, तर अन्य जिल्ह्यात ते ई-गृहप्रवेश करून देणार आहेत. पंतप्रधान एक बटन दाबून ई- गृहप्रवेश करून देतील.

Web Title: E-Home entrance of one lakh houses by Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.