सेल्फी काढताना दरडी कोसळू लागल्या

By admin | Published: June 21, 2017 01:44 AM2017-06-21T01:44:41+5:302017-06-21T01:44:41+5:30

समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. सेल्फी घेत असलेल्या एका व्यक्तीचा हा व्हिडिओ असून, यात ही व्यक्ती मिझोराममध्ये दरडी कोसळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या

During the removal of selfies the turbulence began to collapse | सेल्फी काढताना दरडी कोसळू लागल्या

सेल्फी काढताना दरडी कोसळू लागल्या

Next

नवी दिल्ली : समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. सेल्फी घेत असलेल्या एका व्यक्तीचा हा व्हिडिओ असून, यात ही व्यक्ती मिझोराममध्ये दरडी कोसळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात सेल्फी घेताना दिसते. या व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाइल समोर धरताच दरडी कोसळू लागल्या आणि मग एकच हलकल्लोळ माजला. सेल्फीत या
व्यक्तीच्या पाठीमागे मोठमोठे दगड आणि शिळा घसरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ लोकांचे वाढते सेल्फीवेड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत जागृत करतो. व्हिडिओत लोक एकमेकांना तेथून ताबडतोब निघून जाण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. सुदैवाने सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीसह तेथे असलेले सर्व लोक बचावले; मात्र शिळांखाली दबून अनेक वाहने चक्काचूर झाली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोकादायक सेल्फी घेणारे सुधारतील, अशी आशा आहे.

Web Title: During the removal of selfies the turbulence began to collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.