अपात्रतेचा मुद्दा; आम आदमी पार्टी नव्याने करणार याचिका, पहिली याचिका घेतली मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:38 AM2018-01-23T01:38:21+5:302018-01-23T01:39:02+5:30

निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे.

 Disqualification issue; The Aam Aadmi Party will petition for the new one, the first petition is taken back | अपात्रतेचा मुद्दा; आम आदमी पार्टी नव्याने करणार याचिका, पहिली याचिका घेतली मागे

अपात्रतेचा मुद्दा; आम आदमी पार्टी नव्याने करणार याचिका, पहिली याचिका घेतली मागे

Next

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे. लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झालेली आहे. तथापि, या आमदारांनी सोमवारी स्पष्ट केले की, अपात्र ठरविण्याच्या अधिसूचनेवर विचार विमर्श केल्यानंतर, ते न्यायालयात नव्याने अर्ज दाखल करणार आहेत.
न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी या आमदारांना आपला अर्ज परत घेण्याची परवानगी दिली आहे. आपकडून हजर असलेले एक वकील मनीष वशिष्ट यांनी न्यायालयात सांगितले की, निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशींना आव्हान देणारी
याचिका आता अर्थहीन आहे.
कारण याबाबतची अधिसूचना २० जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे.
यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी -
आपच्या आमदारांना अपात्र ठरविण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय म्हणजे तुघलकशाही असल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांनी केली आहे. यशवंत सिन्हा यांनी टिष्ट्वट केले आहे की, राष्ट्रपतींचा निर्णय हा न्यायाच्या विरुद्ध आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी
टिष्ट्वट केले की, आपच्या विरोधातील हे सूडाचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही.
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारनेच हे घडवून आणले. आमदारांनी बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नाही. भाजपाने आगामी २ वर्षांसाठी दिल्लीतील विकास कामे रोखली आहेत. मात्र, लोक याला चांगले प्रत्युत्तर देतील
- मनीष सिसोदिया,
उपमुख्यमंत्री, दिल्ली.

Web Title:  Disqualification issue; The Aam Aadmi Party will petition for the new one, the first petition is taken back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.