दिग्विजय यांचे सरचिटणीसपद गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:39 AM2017-08-02T00:39:57+5:302017-08-02T00:40:02+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसने सरचिटणीसपदावरून दूर केले आहे. हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तेलंगणाच्या जबाबदारीतूनही त्यांना मुक्त करण्यात आले आहे.

Digvijay became the General Secretary | दिग्विजय यांचे सरचिटणीसपद गेले

दिग्विजय यांचे सरचिटणीसपद गेले

Next

शीलेश शर्मा।
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसने सरचिटणीसपदावरून दूर केले आहे. हा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तेलंगणाच्या जबाबदारीतूनही त्यांना मुक्त करण्यात आले आहे.
एके काळी राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाºया दिग्विजयसिंग यांनी गोव्यात काँग्रेसचे सरकार बनण्याची पूर्ण शक्यता असतानाही काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे तिथे भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पक्षात त्यांच्याविषयी नाराजी होती.
लवकरच मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी ज्योतिरादित्य सिंदिया व कमलनाथ यांच्याशी जुळवून घ्यावे, असे त्यांना सांगण्यात येईल. मात्र प्रदेशाध्यक्षपद त्यांना न देता कमलनाथ वा सिंदिया यांनाच दिले जाण्याची चर्चा आहे. काँग्रेसने विविध स्तरांतील लोकांना जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी व्यावसायिकांना एकत्र आणण्याची जबाबदारी शशी थरूर यांना देण्यात आली आहे आणि असंघटित कामगार विभागाचे अध्यक्षपद अरविंद सिंंह व उपाध्यक्षपद इरफान आलम यांना देण्यात आले आहे.

Web Title: Digvijay became the General Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.