हृदयद्रावक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्न करायला निघालेल्या कपलचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 02:21 PM2024-03-25T14:21:25+5:302024-03-25T14:32:03+5:30

अपघातात तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघंही लग्न करणार होते. तर आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. 

couple died in road accident truck came on wrong side and crushed them | हृदयद्रावक! सुखी संसाराचं स्वप्न अधूरं राहिलं; लग्न करायला निघालेल्या कपलचा अपघातात मृत्यू

फोटो - zeenews

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्रधरपूर-चाईबासा मुख्य मार्ग NH-75 (E) वर रविवारी दुपारी एका भरधाव ट्रकने बाईकवर असलेल्या तिघांना चिरडलं. या अपघातात तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघंही लग्न करणार होते. तर आणखी एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. 

दोन्ही प्रेमी लग्न करणार होते. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उत्तम उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जमशेदपूरला पाठवण्यात आले. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकचालकाला आसपासच्या ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, इटीहासा पंचायतीच्या डुईकासाई गावातील निवासी रमेश केराई आणि नरसिंह केराई हे बाईकवरून तांतनगर ओपी परिसरातील कुलाबुरू गावात गेले होते. रमेश केराई हा आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी बाईकवरून चक्रधरपूरकडे जात होता. याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या बाईकला चिरडले. यामध्ये रमेश केराई आणि त्याच्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. तर नरसिंग केराई हे गंभीर जखमी झाले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून त्याच्या ताब्यात दिले. तर गंभीर जखमी नरसिंह केराई याला प्राथमिक उपचारासाठी चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जामुदा यांनी प्रशासनाला बचावकार्यात मदत केली. मुफसिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेला. 
 

Web Title: couple died in road accident truck came on wrong side and crushed them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात