Coronavirus: कोरोनाचा धोका टळला नाही, चाचणी वाढवा; केंद्राच्या राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:54 PM2022-06-13T20:54:06+5:302022-06-13T20:54:40+5:30

कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे

Coronavirus: coronavirus risk not averted, increase testing; Advice to the Central State Government | Coronavirus: कोरोनाचा धोका टळला नाही, चाचणी वाढवा; केंद्राच्या राज्य सरकारला सूचना

Coronavirus: कोरोनाचा धोका टळला नाही, चाचणी वाढवा; केंद्राच्या राज्य सरकारला सूचना

Next

नवी दिल्ली - देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात ८ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे सरकारमध्ये चिंता पसरली आहे. देशात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्याचं आवाहन त्यांनी केले. 

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना संक्रमण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवलं पाहिजे. त्याचसोबत वृद्धांना बूस्टर डोस देण्यावरही विशेष लक्ष ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंटची ओळख पटवण्यासाठी जीनोम सीक्वेसिंगही वाढवलं पाहिजे. सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना संक्रमणाचाही बैठकीत आढावा घेतला. 

कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे. कोविड नियमांचे पालनही करावे. मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याचीही जनजागृती लोकांमध्ये करायला हवी. काही राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत जिल्हा आणि राज्यात कोविड १९ टेस्टिंग कमी झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचणीत वाढ करावी अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत १८८५ रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय ७७४ कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून २४ तासांत १ हजार ११८ रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली तरी राज्यातील सक्रीय रुग्णांत २४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील १० दिवसांत राज्यात सक्रीय रुग्णसंख्या ५ हजार १२७ वरून आता १७ हजार ८४० इतकी झाली आहे. सोमवारी राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. मागील दहा दिवसातील कोरोना आकडेवारी घाबरवणारी आहे. मुंबईत वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शहर कोरोना हॉटस्पॉट बनतंय का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. 

Web Title: Coronavirus: coronavirus risk not averted, increase testing; Advice to the Central State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.