चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:08 PM2023-08-23T19:08:55+5:302023-08-23T19:09:17+5:30

Chandrayaan 3 Landing Live: इस्रोच्या अधिकृत चॅनेलवर लाखो लोकांनी चंद्रयान-3 ची लाईव्ह लँडिंग पाहिली.

Chandrayaan 3 Live: Chandrayaan-3; ISRO broke NASA's record, lakhs of people watched the LIVE video... | चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

googlenewsNext

Chandrayaan 3 Live Updates: भारताचे चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. ही कामगिरी करणारा भारत पहिला देश ठरला आहे. या बाबतीत ISRO ने अमेरिकेच्या NASA लाही मागे टाकले आहे. यासोबतच इस्रोने चंद्रयान 3 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्येही नासाला मागे टाकले आहे. इस्रोच्या युट्यूब चॅनेलवर लाखो लोकांनी चंद्रयान 3 चे लँडिंग पाहिले. 

नासाने 2021 मध्ये मंगळावर पर्सवेरन्स रोव्हर पाठवले होते, त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग 3.81 लाख लोकांनी लाईक केले, तर इस्रोच्या चंद्रयान 3 च्या लाईव्ह स्ट्रीमिंगला 20 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. संध्याकाळी 5 वाजेपासून इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर 3.5 लाखांहून अधिक लोक लाइव्ह आले होते. इस्रोने 5.20 वाजता थेट प्रक्षेपण सुरू केले. लाईव्हची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी लाईव्हमध्ये सामील होणा-यांची संख्या वाढू लागली. चांद्रयान 3 च्या थेट प्रक्षेपणाच्या वेळी 80 लाख लोक लाईव्ह होते.

नासाची मंगळ मोहीम
नासाने 2021 मध्ये मंगळावर प्रोटेक्शन रोव्हर पाठवले होते. 19 फेब्रुवारी 2021 रोजी, नासाचे प्रोटेक्शन रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. नासाच्या यूट्यूब चॅनलवरील लाइव्ह व्हिडिओ 16,796,823 लोकांनी पाहिला. मंगळ मोहिमेवरील रोव्हरचे लाईव्ह 3.81 लाख लोकांनी लाइक केले.

करोडो लोकांनी चंद्रयान 3 लाईव्ह पाहिला
दरम्यान, 80 लाखांहून अधिक लोक चंद्रयान 3 च्या लाईव्हमध्ये सामील झाले. याशिवाय लाइव्ह टेलिकास्टला 20 लाख लोकांनी लाईक केले. इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर कमेंट्सचा महापूर आला आहे. यूट्यूब व्यतिरिक्त, भारतीय अंतराळ संस्थेने अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर देखील थेट प्रक्षेपण केले. चंद्रयान 3 डिस्ने प्लस हॉटस्टार आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि डीडी नॅशनल चॅनेलवरही लाइव्ह दाखवण्यात आले.

हा पराक्रम करणारा भारत पहिला देश 
चंद्रयान 3 च्या लँडिंगसारख्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हा पराक्रम केला आहे. 

Web Title: Chandrayaan 3 Live: Chandrayaan-3; ISRO broke NASA's record, lakhs of people watched the LIVE video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.