निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 08:16 AM2018-11-17T08:16:49+5:302018-11-17T08:17:36+5:30

घरचा अहेर देत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने सोडला पक्ष

The candidacy of the loyalists to the candidates | निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

Next

धनाजी कांबळे

हैैदराबाद : पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाऱ्यांना तिकीट दिले जात असल्याचा आरोप करून काँग्रेसचे तेलंगणातील वरिष्ठ मुस्लिम नेते अबिद रसूल खान यांनी टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने याआधीच ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसºया यादीत १० जणांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यात मुस्लिमांतील निष्ठावान व प्रामाणिक इच्छुकांना डावलण्यात आले असून, उमेदवारी देताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अबिद रसूल खान यांनी केला.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष असलेल्या खान यांनी म्हटले आहे की, तिकीट वाटप करताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याने याला सामाजिक न्याय म्हणता येणार नाही. जुन्या दहा जिल्ह्यांमध्ये जिथे मुस्लिमांची ताकद आहे आणि आपले उमेदवार विजयी होऊ शकतील, अशा ठिकाणी मुस्लीम उमेदवारांना संधी द्यायला हवी. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही. अजूनही वेळ गेली नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या ७५ उमेदवारांमध्ये केवळ ४ मुस्लीम आहेत. त्यापैकी दोन जण तर नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, एक जण अद्याप पक्षाचा सदस्यही नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.

नलगोंडा, निजामाबाद आणि खम्मम या भागांत मुस्लिमांची ताकद ३० ते ३५ टक्के आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजाचा
उमेदवार द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचा विचार होणार नसेल, तर भाजपामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काय फरक असा सवालही खान यांनी केला आहे.

टीआरएस पक्षात प्रवेश
काँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते अबिद रसूल खान यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनीही काँग्रेसला याच कारणावरून अलविदा केला.

तीन जागांमुळे सीपीआय नाराज
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे व के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबच टीडीपी, टीजेएस आणि सीपीआयशी महाआघाडी केली आहे. जागावाटप करताना सर्वांना सामावून घेण्याचा व न्याय देण्याचा प्रयत्न केला.

सीपीआयला तीनच जागा सोडण्यात आल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्त केसीआर सरकारच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या जनतेला पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेससोबतच राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सीपीआयला ५ जागा मिळाव्यात, अशी त्यांच्या नेत्यांची अपेक्षा होती.

 

Web Title: The candidacy of the loyalists to the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.