'इथे' एक लिटर दुधाला मिळतोय 3 हजाराचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 01:23 PM2018-07-07T13:23:29+5:302018-07-07T13:33:35+5:30

दुधाला सामान्यत: प्रतिलीटर 50 ते 55 रुपयांचा भाव मिळतो. मात्र तुम्हाला जर कोणी सांगितलं की एका लीटर दुधासाठी 3000 इतका भाव मिळतो तर सुरुवातीला तुमचाही विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे

camel milk 3000 rs a litre is making india happy | 'इथे' एक लिटर दुधाला मिळतोय 3 हजाराचा भाव

'इथे' एक लिटर दुधाला मिळतोय 3 हजाराचा भाव

Next

जयपूर : दुधाला सामान्यत: प्रतिलीटर 50 ते 55 रुपयांचा भाव मिळतो. मात्र तुम्हाला जर कोणी सांगितलं की एका लीटर दुधासाठी 3000 इतका भाव मिळतो तर सुरुवातीला तुमचाही विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. राजस्थानातील कॅमल मिल्क म्हणजेच उंटिणीच्या दूधाला प्रतिलीटर तीन हजार इतका भाव मिळतो. कारण अमेरिकेमध्ये उंटिणीच्या दुधाला आणि दूध पावडरला मोठी मागणी आहे. त्यामुळेच एका लीटर दुधाची किंमत ही 50 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

राजस्थानमधील उंट मालक हे बिकानेर, कच्छ आणि सूरतमधील मॅन्युफॅक्चरिंग युनिटला दूध विकतात. दुधाचे 200ml चे टेट्रा पॅक तर दूध पावडरची 200 आणि 500 ग्रॅमची पाकिटं करून विक्री केली जाते. तसेच ई-कॉमर्सच्या मदतीने दुधाची विक्री करणं आता सहज सोपं झालं आहे. एक कंपनी दिवसाला साधारण 6000 लीटर उंटिणींच्या दुधाची विक्री करते. उंटिणीचं दूध हे पचायला हलक असतं. तसंच त्यातील पोषक तत्वांमुळे अनेक आजारांपासूनही बचाव होतो. त्यामुळेच या दुधाला अमेरिकेत मोठी मागणी आहे.
 

Web Title: camel milk 3000 rs a litre is making india happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध