Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 04:38 PM2018-01-31T16:38:11+5:302018-01-31T16:41:09+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारी 2018ला 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Budget 2018: 10 interesting facts related to India Budget | Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी

Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी

Next

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र 1999 सालापूर्वी संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी 5 वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र 1999मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी 11 वाजताची केली. 1992पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी....
- स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली मांडण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 पासून ते 31 मार्च 1948 पर्यंत या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प होता. 

- 1950  मध्ये प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. 

- 1955-56 च्या अर्थसंकल्पाचे सर्व दस्तावेज पहिल्यांदा हिंदी भाषेत छापण्यात आले होते. यापूर्वी दस्तावेज इंग्रजी भाषेतच छापण्यात येत होते.  

- मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह आणि मनमोहन सिंह या चार माजी पंतप्रधानांनी अर्थमंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे.  

- पंतप्रधानपदी विराजमान असताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी होती. 

- जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 सालचा अर्थसंकल्प मांडला. पुढल्या वर्षी 28 फेब्रुवारीच्या दिवशीच अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी घोषणा त्या दिवशी करण्यात आली.  

-  मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे तर पी. चिदंबरम यांनी 8 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे. 

- अर्थमंत्री असताना 1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. 

- 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या सादर  न करता त्याचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. 
 

Web Title: Budget 2018: 10 interesting facts related to India Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.