कामाख्या-डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात स्फोट, 11 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 08:39 PM2018-12-01T20:39:01+5:302018-12-01T21:54:02+5:30

आसाममध्ये इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये झालेल्या स्फोटात 11 जण जखमी झाले आहे.

The blast in the compartment of Kamakhya-Dekargaon Intercity Express and 11 others injured | कामाख्या-डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात स्फोट, 11 जण जखमी

कामाख्या-डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात स्फोट, 11 जण जखमी

Next

गोहाटी - आसाममध्ये इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यामध्ये झालेल्या स्फोटात 11 जण जखमी झाले आहे. कामाख्या डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या एका डब्यात उदलगुरी येथे हा स्फोट झाला आहे. संध्याकाळी 6.45 च्या सुमारास धावत्या ट्रेनमध्ये हा स्फोट झाला, अशी माहिती दिली. मात्र हा स्फोट बॉम्बस्फोट होता की शॉर्ट सर्किट याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.  

या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ''कामाख्या-डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात संध्याकाळी 6.45 च्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात 11 प्रवासी जखमी झाले आहेत.''


कामाख्या-डेकारगाव इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्यात झालेला स्फोट हा कमी क्षमतेचा स्फोट होता. मात्र त्यामुळे ट्रेनचे मोठे नुकसान झालेले नाही. तसेच या मार्गावरील वाहतुकही प्रभावित झालेली नाही,  असे नॉर्दन फ्रंटियर रेल्वेचे पीआरओ नृपेन भट्टाचार्य यांनी सांगितले.   



 

Web Title: The blast in the compartment of Kamakhya-Dekargaon Intercity Express and 11 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.