छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:14 AM2018-12-12T04:14:07+5:302018-12-12T06:38:00+5:30

आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे.

BJP leaders in Chhattisgarh cast a lot of confidence | छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

Next

- योगेश पांडे

हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे, ‘जो खुदको किताब कहते थे वो बिखरे हुए पन्ने निकले’. छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी असेच चित्र दिसून आले. आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. छत्तीसगडमध्ये १५ वर्षांनंतर ‘कमबॅक’ करणाऱ्या काँग्रेसच्या विजयात सर्वात मोलाचा वाटा उचलला तो राहुल गांधी व त्यांच्या टीमने.

एकीकडे भाजपाचा विकासाचा नारा सुरू असताना काँग्रेसने मात्र तळागाळात जाऊन प्रचार करण्यावर जास्त भर दिला व त्याचेच फळ या निकालांमध्ये दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल, पक्ष प्रभारी पी.एल.पुनिया, माजी प्रदेशाध्यक्ष चरणदास महंत, विरोधी पक्षनेते टी. एस. सिंहदेव, माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम व ‘एआयसीसी’च्या ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांच्या सामूहिक प्रयत्नांतून काँग्रेसला यशोशिखर गाठता आले.

भ्रष्टाचार, कर्जबाजारी शेतकरी, राज्यातील गरिबी, नक्षलग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी या मुद्यांवर कॉंग्रेसने जास्त भर दिला. ‘गढबो नवा छत्तीसगड’ हा काँग्रेसचा नारा पक्षाला नवी उर्जा देणारा ठरला. या निकालांनी छत्तीसगड कॉंग्रेसला २०१९ साठी हुरूप दिला आहे हे निश्चित.

निकालाची कारणे...
१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेची नाराजी. मंत्री, आमदारांची अकार्यक्षमता.
निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रभावी व्यवस्थापन. तळागाळात जाऊन नेमक्या समस्यांवर ठेवले बोट.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात १७ सभा घेऊन वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घेतला.

Web Title: BJP leaders in Chhattisgarh cast a lot of confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.