अरूणाचल प्रदेशची बातमी-सुधारीत

By Admin | Published: February 20, 2016 12:34 AM2016-02-20T00:34:41+5:302016-02-20T00:34:41+5:30

अरुणाचल प्रदेशच्या

Arunachal Pradesh's news-upgraded | अरूणाचल प्रदेशची बातमी-सुधारीत

अरूणाचल प्रदेशची बातमी-सुधारीत

googlenewsNext
ुणाचल प्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदी कलिखो पूल
इटानगर : काँग्रेसचे बंडखोर नेते कलिखो पूल (४७) यांनी शुक्रवारी रात्री अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. पी. राजखोवा यांनी त्यांना येथील राजभवनवर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि गेल्या दोन महिन्यांपासूनची तेथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. त्याआधी सवार्ेच्च न्यायालयाने राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला आणि राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबम तुकी यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या पूल यांच्या नेतृत्वाखालील या सरकारला काँग्रेसच्या बंडखोर १९, भाजपच्या ११ व दोन अपक्ष आमदारांचा बाहेरून पाठिंबा आहे. विधानसभेची सदस्यसंख्या ६० आहे. दोन अपक्ष आमदारांचा सरकारमध्ये बहुधा समावेश होईल. तुकी यांना काँग्रेसच्या २६ आमदारांचा पाठिंबा आहे. शपथविधीनंतर पूल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांशी चर्चा करून मी मंत्रिमंडळाचा विस्तार करीन, असे सांगितले. मात्र त्यांनी त्यासाठी निश्चित तारीख सांगितली नाही. सीमेवरील या राज्यात नव्याने निवडणुका घेता याव्यात यासाठी नव्या सरकारकडून विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते अशीही चर्चा होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्या शिफारशीला मान्यता दिली व सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे नवी दिल्लीत गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नबम तुकी यांनी राष्ट्रपतींची परवानगी मिळविली होती; परंतु ती शुक्रवारी सवार्ेच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Web Title: Arunachal Pradesh's news-upgraded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.