‘एम्स’मध्ये वावरणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:53 PM2018-04-16T23:53:19+5:302018-04-16T23:53:19+5:30

गेले पाच महिने येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) डॉक्टरच्या आविर्भावात वावरणाºया अदनान खुर्रम या १९ वर्षांच्या तोतयाला पोलिसांनी अटक केली.

 The arrest of a doctor on 'AIIMS' | ‘एम्स’मध्ये वावरणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक

‘एम्स’मध्ये वावरणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक

googlenewsNext

नवी दिल्ली : गेले पाच महिने येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) डॉक्टरच्या आविर्भावात वावरणाºया अदनान खुर्रम या १९ वर्षांच्या तोतयाला पोलिसांनी अटक केली.
अदनान मुळचा बिहारचा असून तो डॉक्टरचा पांढरा कोट घालून व गळ््यात स्टेथोस्कोप अडकवून सर्रासपणे वावरत असे. अनेकांना तो आपण वैद्यकीय विद्यार्थी असल्याचे किंवा निवासी डॉक्टर असल्याचे सांगत असे. त्याने अनेक डॉक्टरांशी चांगली मैत्री केली होती व डॉक्टरांसाठी आयोजित केल्या जाणाºया कार्यक्रमांनाही तो हजेरी लावत असे. डॉक्टरांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येही तो सहभागी झाला होता.
शनिवारी डॉक्टरांसाठी आयोजित मॅरेथॉनमध्ये तो सहभागी झाला
आणि ओळखपत्र नसल्याने त्याचे
बिंग फुटले.

Web Title:  The arrest of a doctor on 'AIIMS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक