जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:21 AM2017-09-23T04:21:43+5:302017-09-23T04:22:01+5:30

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.

Answer by saying, India's Pakal alert, two terrorist militants | जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

जशास तसे उत्तर देऊ, भारताचा पाकला इशारा, दोन अतिरेकी जेरबंद

Next


जम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री जम्मूतील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय चौक्या व गावांंना लक्ष्य करीत तोफमारा आणि गोळीबार केला. त्यामुळे गावांत अडकलेल्या ७२७ रहिवाशांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. दरम्यान, पाकच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले होते.
हे असेच सुरू राहिले, तर आम्ही याच भाषेत प्रत्युत्तर देऊ , असे भारताने म्हटले आहे. पाकच्या गोळीबारात आमचा एकही सैनिक वा रहिवासी यांना इजा झाली, तर तुमचीही भारतीय जवान खैर करणार नाही, असे भारताच्या डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेश्न्स ए. के. भट यांनी पाकिस्तानी लष्करी अधिका-यांना कळविले आहे.
जोराफार्म गावातील ७८ गुज्जर पाकिस्तानच्या गोळीबारात अडकले होते, तसेच अर्नियातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या अन्य गावातील रहिवासीही तोफमारा आणि गोळीबारात अडकल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. चालू आठवड्यात आंतरराष्टÑीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबारासोबत तोफमारा सुरू आहे. (वृत्तसंस्था)
>दहशतवाद्यांना अटक
सीमा सशस्त्र दलाच्या पथकावर बुधवारी बनिहाल येथे करण्यात आलेल्या हल्ल्यातील दोन अतिरेक्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अतिरेकी हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर अन्य एक जवान
जखमी
झाला होता. या अतिरेकी हल्ल्यानंतर बनिहाल पट्ट्यात पोलिसांनी २४ तासांची कसून शोधमोहीम राबवत गजनफर आणि अरिफ या दोन अतिरेक्यांना अटक केली, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.
>भारतावरच उलटा आरोप...
शस्त्रबंदी झुगारत आंतरराष्टÑीय सीमा
आणि नियंत्रण रेषेगलगतच्या भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांना सातत्याने लक्ष्य करणाºया पाकिस्तानने उलट बोंबा मारल्या आहेत. भारतीय लष्कराने छापर, चारवाह आणि हरपाल भागात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा नागरिक ठार झाले, असा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे.
पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या हल्ल्यात आमचे २६ नागरिकही जखमी झाले आहेत.
अनेक जण जखमी
गुरुवारी पाकिस्तानने १५हून अधिक भारतीय सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक रहिवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: Answer by saying, India's Pakal alert, two terrorist militants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.