भाजपाला आणखी एक धक्का? टीडीपीनंतर नंतर 'या' पक्षाने वाढवल्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 05:15 PM2018-03-08T17:15:04+5:302018-03-08T18:35:06+5:30

टीडीपीच्या या निर्णयामुळं आडचणीत सापडले असतानाच आणखी एका पक्षाने त्यात भर घातली आहे. 

Another push for BJP? After the TDP, there was a problem raised by this 'party' | भाजपाला आणखी एक धक्का? टीडीपीनंतर नंतर 'या' पक्षाने वाढवल्या अडचणी

भाजपाला आणखी एक धक्का? टीडीपीनंतर नंतर 'या' पक्षाने वाढवल्या अडचणी

Next

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न दिल्याने नाराज चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीच्या या निर्णयामुळं आडचणीत सापडले असतानाच आणखी एका पक्षाने त्यात भर घातली आहे. 

नेटवर्क 18 च्या वृत्तानुसार, बिहारमधील भाजपाचा मित्रपक्ष जनता दल युनायटेड (JD(U) )नेही आपल्या राज्याला विशेष दर्जा का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याआधीही बिहार राज्याला विशेष दर्जा मिळावा यासाठी मोदी सरकारकडे साकडे घातले होते. जनता दल युनायटेडचे पूर्व राज्यसभा सदस्या आणि राष्ट्रीय प्रवक्ता पवन वर्मा यांनी आता बिहार राज्याला विषेश दर्जा मिळायला हवे अशी मागणी केली आहे.  जनता दल युनायटेड पक्षाने बिहार राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा याची मागणी पुन्हा एखदा केली आहे. भाजपाकडून यावर आद्याप काहीही स्पष्टीकरण आले नाही. 

दरम्यान, आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने (टीडीपी) केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. 

अतिआत्मविश्वास भाजपाच्या अंगलट येईल - शिवसेना 
एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देसमची भूमिका अपेक्षिक होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार? या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, टीडीपीने शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली. सत्तेला चिकटलेले मुंगळे एक-एक करून सत्तेतून बाहेर पडतील. बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करु.  



 

Web Title: Another push for BJP? After the TDP, there was a problem raised by this 'party'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.