घटस्फोटाची धमकी दिल्याने संतापलेल्या पतीने गरम सळीने भाजलं पत्नीचं गुप्तांग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 01:29 PM2017-09-27T13:29:45+5:302017-09-27T13:36:31+5:30

एका व्यक्तीने गरम सळीने आपल्या पत्नीचं गुप्तांग भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची चूक फक्त एवढीच होती की, तिने पतीला घटस्फोटाची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

Angered by the threat of divorce, | घटस्फोटाची धमकी दिल्याने संतापलेल्या पतीने गरम सळीने भाजलं पत्नीचं गुप्तांग

घटस्फोटाची धमकी दिल्याने संतापलेल्या पतीने गरम सळीने भाजलं पत्नीचं गुप्तांग

Next
ठळक मुद्देकर्नाटकची राजधानी बंगळुरुत एका व्यक्तीने गरम सळीने आपल्या पत्नीचं गुप्तांग भाजल्याची धक्कादायक घटनाघटस्फोटाची धमकी दिल्याने तिळपापड झालेल्या पतीने हा धक्कादायक प्रकार केलापोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे

बंगळुरु - कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एका व्यक्तीने गरम सळीने आपल्या पत्नीचं गुप्तांग भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची चूक फक्त एवढीच होती की, तिने पतीला घटस्फोटाची धमकी दिली होती. घटस्फोटाची धमकी दिल्याने तिळपापड झालेल्या पतीने हा धक्कादायक प्रकार केला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

बनासवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय आरोपी दिलीप कुमार एका इंटिरिअर डेकोरेशन फर्ममध्ये काम करतो. सहा वर्षांपुर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. दारुच्या नशेत असलेल्या दिलीपने घरी पोहोचताच पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. दिलीपने पत्नीकडे दागिने देण्याची मागणी केली. पत्नीने मारहाणीला विरोध करत दागिने देण्यास नकार दिला तेव्हा दिलीपचा पारा चढला. 

दोघांमधील शाब्दिक चकमक वाढत गेली आणि यादरम्यान पत्नीने मला घटस्फोट हवा असल्याचं सांगितलं. पत्नीने घटस्फोटाचा उल्लेख केलेला ऐकून दिलीप संतापला. यानंतर त्याने सळी गरम केली आणि पत्नीच्या गुप्तांगाला भाजलं. पत्नीने दयेची भीक मागितली, मात्र दिलीपने काहीच ऐकून घेतलं नाही. पत्नीची आरडाओरड ऐकल्यानंतर अखेर शेजारी धावत आले आणि महिलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केलं. 

पीडित महिलेने सांगितलं होतं की, दारुच्या व्यसनामुळे माझ्या पतीने घरातील वस्तू विकण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यांपुर्वी त्याने माझे दागिने मागण्यास सुरुवात केली होती. मी त्याला विरोध करत घरातून निघून जाण्यास सांगितलं. यानंतर त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मला फासावर लटकवून मारुन टाकेन अशी धमकीही त्याने मला दिली होती.

पोलिसांनी सांगितलं की, 'दिलीपला आधी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याने आधीच स्पष्ट केलं होतं की, मी माझ्या पत्नीला सोडणार नाही आणि दुस-या व्यक्तीसोबत लग्न करण्याची परवानगीही देणार नाही'. पोलिसांनी दिलीपविरोधात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पती दिलीपला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 
 

Web Title: Angered by the threat of divorce,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.