कौतुकास्पद! 'हे' आहेत 'बजरंगी भाईजान'; आतापर्यंत तब्बल 600 बेपत्ता मुलांना सुखरुप पोहोचवलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:01 PM2022-01-27T15:01:50+5:302022-01-27T15:10:23+5:30

Bajrangi Bhaijan ASI Rajesh Kumar : मुलगी अंबाला येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला होता, मात्र त्यांना मुलीचा काही पत्ता लागला नव्हता.

ambala ASI Rajesh Kumar popularly as bajrangi bhaijaan more than 600 missing children reunited with their families | कौतुकास्पद! 'हे' आहेत 'बजरंगी भाईजान'; आतापर्यंत तब्बल 600 बेपत्ता मुलांना सुखरुप पोहोचवलं घरी

कौतुकास्पद! 'हे' आहेत 'बजरंगी भाईजान'; आतापर्यंत तब्बल 600 बेपत्ता मुलांना सुखरुप पोहोचवलं घरी

googlenewsNext

नवी दिल्ली - बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijan) म्हणून लोकप्रिय असलेले हरियाणा पोलीस दलातील एएसआय राजेश कुमार (ASI Rajesh Kumar) यांनी पुन्हा एका बेपत्ता मुलीची नातेवाईकांशी भेट घडवून दिली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ही दिव्यांग मुलगी अंबाला येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला होता, मात्र त्यांना मुलीचा काही पत्ता लागला नव्हता. आपल्या मुलीचा शोध घेत असलेल्या कुटुंबाने हरियाणा पोलिसांतील ASI राजेश कुमार यांच्याकडे मुलीचा शोध घेण्याचं आवाहन केलं. 

ASI राजेश कुमार यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास सुरू केला आणि तिच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंगी भाईजान या नावाने प्रसिद्ध असलेले हरियाणा पोलिसांचे ASI राजेश कुमार यांनी आणखी बेपत्ता मुलीची तिच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ही दिव्यांग मुलगी अंबाला येथून बेपत्ता झाली होती, तेव्हापासून तिच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी चकरा मारल्या, मात्र मुलगी सापडली नाही. आपल्या मुलीच्या शोधात भटकत असलेले कुटुंब थकले आणि त्यांनी बजरंगी भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेल्या एएसआय राजेश कुमार यांना त्यांच्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.

एएसआय राजेश कुमार यांनी आतापर्यंत 600 हून अधिक बेपत्ता मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे. या प्रकरणातही राजेश कुमार यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर मुलगी डेहराडून, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाली, तेथून त्यांनी मुलीला ताब्यात घेतले आणि अंबाला येथे कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात मुलीची आई तिच्या मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे आली होती, त्यानंतर मुलीच्या आईची अडचण पाहून त्यांनी तातडीने मुलीचा शोध सुरू केला.

मुलीला डेहराडून येथून ताब्यात घेण्यात आले आणि कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं. बेपत्ता झालेल्या मुलीला भेटून कुटुंबीयांना खूप आनंद झाला आणि त्यांनी एएसआय राजेश कुमार यांचे आभार मानले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता होती. मात्र अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही, त्यानंतर आज राजेश कुमार यांनी आपल्या मुलीशी भेट करून दिली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: ambala ASI Rajesh Kumar popularly as bajrangi bhaijaan more than 600 missing children reunited with their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस