Akhilesh Yadav : ...म्हणून अखिलेश यादव 'भारत जोडो न्याय यात्रेत' सहभागी होणार; स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:29 PM2024-02-07T14:29:04+5:302024-02-07T14:37:54+5:30

Akhilesh Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याच्या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं आहे.

Akhilesh Yadav will reach rae bareli in bharat jodo nyaya yatra ahead of lok sabha elections | Akhilesh Yadav : ...म्हणून अखिलेश यादव 'भारत जोडो न्याय यात्रेत' सहभागी होणार; स्वतःच केला खुलासा

Akhilesh Yadav : ...म्हणून अखिलेश यादव 'भारत जोडो न्याय यात्रेत' सहभागी होणार; स्वतःच केला खुलासा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये रायबरेलीत सहभागी होणार आहेत. सपा प्रमुखांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली. यापूर्वी, सपाने मंगळवारी एक निवेदन जारी करून माहिती दिली होती की, अखिलेश यादव हे अमेठी किंवा रायबरेली येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याच्या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं आहे. रायबरेली लखनौपासून सर्वात जवळ असल्याने मी तेथून यात्रेत सहभागी होणार आहे असं अखिलेश यांनी सांगितलं. सपाने मंगळवारी एक निवेदन जारी केलं होतं. 

"राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. अखिलेश यादव यांनी काँग्रेसचं अभिनंदन करत आमंत्रण स्वीकारलं आणि 16 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात प्रवेश केल्यानंतर अमेठी किंवा रायबरेली येथे 'भारत जोडो न्याय यात्रा'मध्ये सहभागी होण्यास संमती दिली" असं म्हटलं आहे. 

याआधी काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का? या प्रश्नावर "अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र आम्हाला निमंत्रणही मिळत नाही. अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या घटना घडतात. पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही. मग आम्ही स्वतःहून निमंत्रण कसं मागायचं?" असं म्हटलं होतं. 

Web Title: Akhilesh Yadav will reach rae bareli in bharat jodo nyaya yatra ahead of lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.