देणगी दिल्यानंतर ‘मेघा’वर झाली कंत्राटांची बरसात; सर्वात लांब बोगद्याचे कामही कंपनीलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 06:39 AM2024-03-23T06:39:18+5:302024-03-23T06:41:01+5:30

चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांची सत्ताधाऱ्यांना २,७४१ कोटींची देणगी?

After the donation, a flurry of contracts were made on 'Megha' The company also has the longest tunnel work | देणगी दिल्यानंतर ‘मेघा’वर झाली कंत्राटांची बरसात; सर्वात लांब बोगद्याचे कामही कंपनीलाच

देणगी दिल्यानंतर ‘मेघा’वर झाली कंत्राटांची बरसात; सर्वात लांब बोगद्याचे कामही कंपनीलाच

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निवडणूक राेखे खरेदी करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या मेघा इंजिनीअरिंगवर रोखे खरेदीच्या तारखांच्या आसपास कोट्यवधींच्या कंत्राटांची बरसात झाल्याचे आढळले आहे. कंपनीला उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये अनेक कंत्राटे मिळाली. कंपनीने बीआरएसला १९५ काेटी, डीएमकेला ८५ काेटी, वायएसआर काँग्रेसला  ३७ काेटी, टीडीपीला २५ काेटी, काॅंग्रेसला १७ काेटींची देणगी कंपनीने दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयू पक्षाला मेघा इंजिनीअरिंगने ७ जानेवारी २०२२ राेजी १० कोटींची देणगी दिली. त्यानंतर मार्च २०२२मध्ये कंपनीला २३० किलोमीटर लांबीचा दरभंगा एक्स्प्रेस-वे बांधण्याचे कंत्राट मिळाले. या कंपनीने सर्वात कमी रकमेची बाेली लावली हाेती.

  • जदयूला मिळालेली देणगी

- मेघा इंजि. - १० काेटी
- श्री सिमेंट - २ काेटी
- भारती इन्फ्राटेल - १ काेटी

राेखे खरेदी, कंत्राट मिळाल्याचा काळ

# ऑक्टाेबर २०२० : २० काेटी 
- जम्मू-काश्मीरमध्ये आशियातील सर्वाधिक लांबीच्या बाेगद्याचे काम त्याच वर्षी ऑक्टाेबर-नाेव्हेंबरमध्ये मिळाले.

# एप्रिल २०२३ : १४० काेटी
- कंपनीला मुंबई बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचे स्थानक उभारण्याचे ३,६८१ काेटी रुपयांचे कंत्राट मार्च २०२३मध्ये मिळाले.

# ऑक्टाेबर २०१९ : ५ काेटी
- आंध्र प्रदेशमध्ये पाेलावरम प्रकल्पाचे ४,३५८ काेटी रुपयांचे कंत्राट नाेव्हेंबर २०१९मध्ये मिळाले हाेते.

चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांची सत्ताधाऱ्यांना २,७४१ कोटींची देणगी?

सीबीआय, ईडी, आयकर खात्याकडून चौकशी सुरू असलेल्या ४१ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला २७४१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या कंपन्यांवर विविध तपास यंत्रणा व केंद्रीय खात्यांकडून धाडी घातल्या होत्या. त्यानंतर या कंपन्यांनी भाजपला १६९८ कोटी रुपयांचा निधी दिला, असे निवडणूक रोखे योजनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. 

त्यांचे वकील ॲड. प्रशांत भूषण यांनी सांगितले की, ३० बनावट कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. विविध कामांची १७२ कंत्राटे सरकारकडून मिळालेल्या ३३ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांद्वारे पक्षांना निधी दिला आहे. या कंत्राटांच्या कामांच्या खर्चाची एकूण रक्कम ३.७ लाख कोटी रुपये आहे. त्याबदल्यात भाजपला १७५१ कोटी रुपयांची देणगी देण्यात आल्याचा दावाही ॲड. प्रशांत भूषण यांनी केला.

Web Title: After the donation, a flurry of contracts were made on 'Megha' The company also has the longest tunnel work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.