'मम्मी-पप्पा मला माफ करा...'; परीक्षेच्या दोन दिवसांआधी 'NEET' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यीनीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 02:05 PM2024-01-29T14:05:44+5:302024-01-29T14:11:28+5:30

राजस्थानातील कोटा हे शहर विविध प्रकारच्या कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध आहे.

A iit jee student ends her life the girl was leave note for her parents in rajsthan kota city  | 'मम्मी-पप्पा मला माफ करा...'; परीक्षेच्या दोन दिवसांआधी 'NEET' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यीनीने संपवलं जीवन

'मम्मी-पप्पा मला माफ करा...'; परीक्षेच्या दोन दिवसांआधी 'NEET' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यीनीने संपवलं जीवन

कोटा : भारतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजस्ठानमधील कोटा शहर विशेष आकर्षण आहे. विद्यार्थ्यांचा वाढता कल या शहराकडे आहे. भारताच्या विविध भागातून मोठ्या संख्येने 'NEET-JEE' परीक्षांची तयारी विद्यार्थी या शहरात येत असतात. पण मागील काही महिन्यांपासून कोटा शहर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. 

कोटा येथे NEET-JEE ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने परीक्षेच्या तणावामुळे तिचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊ ठेपलेल्या  'JEE Mains' परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मागील काही वर्षांमध्ये या शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा विषय गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, नीट परीक्षेची तयार एका मुलीने अभ्यासाच्या दबावामुळे आत्महत्या केली. कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये जेईई मेनची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याचा खुलासा त्या मुलीने स्वत: च्या हस्ताक्षरात लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केलाय. त्या सुसाईड नोटमध्ये तणावग्रस्त मुलीने परीक्षेच्या दबावाखाली आल्याने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. 

आत्महत्या करणाऱ्या मुलीनं नेमकं काय लिहिलं?

"मम्मी-पप्पा मी जेईई करू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येचं कारण मीच आहे. मी सर्वात वाईट मुलगी आहे, मम्मी-पप्पा मला माफ करा, माझ्याकडे हा शेवटचा पर्याय होता", असं सदर मुलीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Web Title: A iit jee student ends her life the girl was leave note for her parents in rajsthan kota city 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.