देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 01:15 PM2017-09-02T13:15:41+5:302017-09-02T13:19:56+5:30

देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत

800 engineering colleges across the country to shut down | देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

Next
ठळक मुद्देइंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेतज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतातकिंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात

बेंगळुरू, दि. 2 - देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरवर्षी इंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या कॉलेजमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात व सलग पाच वर्षे ज्या कॉलेजेसमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्या जात नाहीत, अशी कॉलेजं बंद व्हायला हवीत असा या शिखर संस्थेचा नियम आहे.
बेंगळूरमध्ये एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी सहस्त्रबुद्धे आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाईटनुसार 2014-15 ते 2017-18 या कालावधीत देशभरातील सुमारे 410 इंजिनीअरिंग कॉलेजना बंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यातील 20 संस्था कर्नाटकमधील आहेत. 2016-17 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमधल्या संस्था जास्त प्रमाणात आहेत, ज्यांनी टप्प्या टप्प्याने कॉलेज बंद करण्याची अनुमती एआयसीटीईकडे मागितली आहे.

राज्यनिहाय खासगी इंजिनीअरिंग कॉलेजे, जी बंद होऊ इच्छितात

तेलंगणा - 64
महाराष्ट्र - 59
उत्तर प्रदेश - 47
तामिळनाडू - 31
हरयाणा - 31
राजस्थान - 30
आंध्र प्रदेश - 29
गुजरात - 29 
कर्नाटक - 21
मध्य प्रदेश - 21
पंजाब - 19

ज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात. टप्प्या टप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेता येणे. 
कॉलेजेचचा दर्जा, शिक्षणाचा नोकरी मिळण्यासाठी होणारा उपयोग ही या कॉलेजसमोरची महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हा ही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी विद्यादानाचे काम करतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील असे इंजिनीअर घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

Web Title: 800 engineering colleges across the country to shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.