जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 08:34 PM2023-10-22T20:34:23+5:302023-10-22T20:35:41+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये बस उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली.

6 Devotees Injured After Minibus en Route Mata Mehrada Shrine Turns Turtle in Udhampu in Jammu and Kashmir Bus Accident, watch here video  | जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO

जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO

Jammu and Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये बस उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. उधमपूर जिल्ह्यात हा अपघात झाला असून रामनगरहून माता मेहरादा यात्रेसाठी जाणारी मिनी बस उलटली. या अपघातात सहा भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी तेथील घोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.  

उधमपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्वर-उल-हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील माता मेहरादा तीर्थक्षेत्र यात्रेसाठी निघालेल्या बसचा अपघात झाला. ही बस रामनगर येथून निघाली होती पण प्रवासादरम्यान बस उलटल्यामुळे सहा भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी घोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
 

Web Title: 6 Devotees Injured After Minibus en Route Mata Mehrada Shrine Turns Turtle in Udhampu in Jammu and Kashmir Bus Accident, watch here video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.