वीजदरवाढीच्या विरोधात आपची निर्दशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 01:38 AM2022-07-14T01:38:07+5:302022-07-14T01:38:29+5:30

महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून मोठा झटका दिल्याचा आरोप करत, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली.

Your instructions against power tariff hike | वीजदरवाढीच्या विरोधात आपची निर्दशने

वीजदरवाढीच्या विरोधात आपची निर्दशने

Next

नाशिक रोड : महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून मोठा झटका दिल्याचा आरोप करत, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली. वीजदर वाढ रद्द झालीच पाहिजे, २०० युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे, रद्द करा रद्द करा, वीज दरवाढ रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामध्ये शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील, प्रमोदिनी चव्हाण, योगेश कापसे, संतोष राऊत, एकनाथ सावळे, अनिल फोकणे, चंद्रशेखर महानुभाव, दीपक सरोदे, सुमित शर्मा, तुषार थेटे, साहिल सिंग, स्वप्निल घिया आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Web Title: Your instructions against power tariff hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.