अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 05:47 PM2019-04-25T17:47:31+5:302019-04-25T17:47:39+5:30

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.

 The wild animal in search of food | अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे

अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी गावकुसाकडे

Next
ठळक मुद्देआता तरी वनविभागाकडून या वन्यप्राण्यांसाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरीची दुरुस्ती करण्यात येऊन त्या विहिरीतील पडलेला गाळ काढल्यास यामुळे वन्यप्राण्यांची पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे.


खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.
खामखेडा गावच्या उत्तरेकडील भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभणगीपर्यंत डोंगरांच्या पर्वत रांगा आहेत. या डोंगरांच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षांपर्यंत भरपूर पाणी होते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरून पाणी पित असे; परंतु या विहिरीचे कठडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे डोंगरात पाणी नाही. तसेच या पर्वत रांगांमध्ये बिबट्यासह अन्य जंगली प्राण्यांचे प्रभावक्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरामध्ये कोणत्याही प्रकारचे वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधारात परिसरात भक्ष्याच्या व पाण्याच्या शोधार्थ फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांती साठी निघून जातात.
मागबारी घाटातून सतरा नंबरचा राज्य महामार्ग असल्याने या घाट परिसरात बºयाच दिवसांपासून बिबट्यांचे वास्तव्य असल्याने या घाटातून रात्रीच्या वेळेस प्रवास करणाºया वाहनधारकांना या बिबट्याचे दर्शन होते. या घाटातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी मांगबारी घाटात रात्रीच्या वेळेस अन्न पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याच्या मादीला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याच्या मादीच्या कानाजवळ मार लागून जागीच ठार झाली होती. त्यामुळे वन्य प्राणिमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या बुटीच्या विहिरीला उन्हाळ्यात पाणी असते. या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायºयांची सोय असल्याने जनावरे खालपर्यंत जाऊन पाणी पिऊन आपली तहान भागवित असे; परंतु या बुटीच्या विहिरीचे कठडे ढासळल्याने विहीर दगड-मातीने भरली आहे. तेव्हा वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात वनतळे व बुटीच्या विहिरींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे .(२५अ‍ॅनिमल मंकी)

Web Title:  The wild animal in search of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.