केटीवेअरमुळे आंबेवासीयांचा सुटला पाणीप्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 07:30 PM2018-08-19T19:30:39+5:302018-08-19T19:33:03+5:30

रोटरी क्लब आॅफ नाशिक व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून पेठ तालुक्यातील शिवशेत व आंबे या गावांना जोडणाऱ्या नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आल्याने या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

 Water problems due to climate change of Ambees | केटीवेअरमुळे आंबेवासीयांचा सुटला पाणीप्रश्न 

केटीवेअरमुळे आंबेवासीयांचा सुटला पाणीप्रश्न 

Next

पेठ : रोटरी क्लब आॅफ नाशिक व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून पेठ तालुक्यातील शिवशेत व आंबे या गावांना जोडणाऱ्या नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आल्याने या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.  पावसाळ्यात मुसळधार पडणारा पाऊस नदी नाल्यातून वाहून जात असल्याने उन्हाळ्यात या परिसरातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होत असे. तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार यांच्या मध्यस्थीने रोटरी क्लब व महिंद्रा कंपनीच्या सामाजिक दायित्वातून आंबे गावाजवळील नदीवर चेक डॅमचे काम सुरू करण्यात आले. अवघ्या चार महिन्यात या बंधाºयाचे काम पूर्ण करून पावसाळ्यात हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. महिंद्राचे नाशिक युनिटचे प्रदीप देशमुख यांच्या हस्ते या बंधाºयाचे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी सीएसआर प्रमुख रमाकांत, राधेय येवला, संजय लिंगायत, अश्विन पाटील, सचिन जाधव, श्रीनाथ भालेराव, गजानन पेंडसे, सुनील सावंत, मुग्धा लेले, श्रेया कुलकर्णी, विवेक जायखेडकर, भारत माळगावे, हिरामण शेवरे, रंगनाथ महाले, गुलाब पवार, गणपत गायकवाड, हेमराज राजपूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Water problems due to climate change of Ambees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.