वारकऱ्यांचा मनपाला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:56 AM2018-06-20T00:56:30+5:302018-06-20T00:56:30+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून निघणाºया संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेने मंडप टाकण्यास नकार दिल्यानंतर आता यंदाचे स्वागत ग्रीन व्ह्यू हॉटेलजवळील नाशिक पंचायत समितीच्या आवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीदेखील सुविधा देणार आहे.

Warakaris's Manpal Rama Ram | वारकऱ्यांचा मनपाला रामराम

वारकऱ्यांचा मनपाला रामराम

googlenewsNext
ठळक मुद्देनिवृत्तिनाथ महाराज पालखी : आता पंचायत समितीत स्वागत होणार

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून निघणाºया संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेने मंडप टाकण्यास नकार दिल्यानंतर आता यंदाचे स्वागत ग्रीन व्ह्यू हॉटेलजवळील नाशिक पंचायत समितीच्या आवारात करण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीदेखील सुविधा देणार आहे. दरम्यान, महापालिकेनेदेखील मंडप वगळता सर्व सुविधा देण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, त्यापेक्षा आयुक्तांनीच स्वागत सोहळ्यास उपस्थित राहावे यासाठी स्वागत समितीच्या वतीने तुकाराम मुंढे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी येत्या २९ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून नाशिकला येणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्रवीर सावरकर जलतरण तलाव येथे स्वागत करण्याचे नियोजन होते, परंतु यंदा शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेला पत्र पाठविले असून, त्यानुसार सण उत्सवासाठी खर्च करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने यंदा मंडप टाकण्यास नकार दिला असला तरी रस्ते, पाणीपुरवठा,


वारकºयांचा
स्वच्छता अशाप्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत.
संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीने यासंदर्भात नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्वागत सोहळ्यासाठी पंचायत समितीची जागा तसेच पाणी आणि अन्य सुविधा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे, तर भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी स्वखर्चाने मंडप उभारण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पालखी स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील, त्र्यंबकराव पाटील, सचिन डोंगरे, भरत ठाकरे, उगल मुगले यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी मंगळवारी (दि.१९) आयुक्ततुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी त्यांना शासनाचे परिपत्रक दाखवले मात्र मंडपाशिवाय सर्व प्रकारच्या सुविधा देण्याची तयारी असल्याचे नमूद केले. मात्र, समितीने सुविधा नसल्या तरी चालतील, परंतु स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आयुक्तांनी ते स्वीकारल्याचे पद्माकर पाटील यांनी सांगितले.
मंडपाच्या खर्चात मनपाचा झोल?
महापालिकेने यापूर्वी स्वागत सोहळ्यासाठी केलेल्या खर्चाची फाइल आयुक्तांनी तपासल्यानंतर त्यात अनेक घोळ आढळले असून, तरण तलावाजवळ स्वागत सोहळ्यासाठी जो चार-पाच तासांसाठी मंडप उभारला जातो त्यावरच दोन ते तीन लाखांचा खर्च झाल्याचे तपशील प्राप्त झाले असल्याचे त्यांनी चर्चेत समितीला सांगितले. त्यापेक्षा अवघ्या पन्नास हजार रुपयांत पालखीने सर्व खर्च केला असता, असे समितीने नमूद केले. टाळ, मृदृंग, बॅटºया किती कोणाला वाटल्या त्याबाबताही घोळ आढळले आहेत.
समितीने सुविधा नसल्या तरी चालतील, परंतु स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आयुक्तांनी ते स्वीकारल्याचे पद्माकर पाटील यांनी सांगितले.

Web Title: Warakaris's Manpal Rama Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.